नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अत्यंत कणखर, गुन्हेगारांचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब असतांना त्यांच्या पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे आणि तलवारीचे हल्ला झेलणारे पोलीस अंमलदार शिवाजी पाटील यांनीच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे माहेर घर बनविले आहे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी या दोघांची सविस्तर चौकशी करून त्यांना त्वरीत निलंबित करावे आणि आपण नांदेडला असतांना चुकीच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केलेली कार्यवाही पुन्हा एकदा करावी अशी अपेक्षा व्यक्त करत सिडको एन.डी-32 भागात राहणारे अशोक संभाजी गायकवाड यांनी अर्ज दिला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुंबई गाजवून आलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे हे कार्यरत आहेत. त्यांनी आल्याबरोबर एलसीबीच्यासोबत एका मोठ्या कार्यवाही भाग घेतला होता आणि त्याच्या पारिश्रमीकात त्यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे देण्यात आले. तेथे तर अत्यंत नामवंत पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब हे मागील एक वर्षापासून जास्त कालखंडापासून तोंडी आदेशावर कार्यरत आहेत. त्यांनी संकेत दिघे यांची दखल अत्यंत जलदगतीने घेतली आणि त्यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख केले. गुन्हे शोध पथकाच्याबाबत आम्ही कांही जास्त लिहुन शकत नाही. कारण आमचे ज्ञान कमी आहे. तरी पण गुन्हे शोध पथकाचा दबदबा सर्वत्र जाणवतोच तसाच दबदबा पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणमध्येसुध्दा असेल यात कांही शंका नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत जे गुन्हे शोध पथकात नसतात, एलसीबीत नसतात तरीपण आम्ही त्यातच कार्यरत आहोत असे जनतेला अर्थात जनतेतील अवैध धंदे करणाऱ्यांना दाखवतात.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकामध्ये संकेत दिघे यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेले पोलीस अंमलदार शिवाजी गंगाधर पाटील बकल नंबर 2929 हे कार्यरत होतेच आणि त्यांना जोड मिळाली संकेत दिघे साहेबांची.ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडको भागात एनडी-32 येथे राहणारे अशोक संभाजी गायकवाड यांनी एक अर्ज विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयात दिला आहे.आज या कार्यालयाचे प्रमुख पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी हे आहेत. गायकवाड यांनी आपल्या या अर्जात निसार तांबोळी यांनी नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक पदाच्या कार्यभार सांभाळल्याचा उल्लेख करून त्या काळात 15 पोलीस अधिकारी व अंमलदार निलंबित केल्याचा उल्लेख आपल्या अर्जात केला आहे.
अशोक गायकवाड आपल्या अर्जात लिहितात संकेत दिघे आणि शिवाजी पाटील हेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व प्रकारचे अवैध धंदे चालवतात. हप्ते गोळा करतात. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही असे अनेकांसमोर बोलतात. दारुच्या दुकांना सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंतची कायदेशीर परवानगी असतांना हप्ता घेवून ते दारुचे दुकाने पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत दुकान चालू ठेवण्यास भाग पाडतात. अवैध धंदेवाल्यांशी बोलतांना तारेखच्या दिवशीच फोन करतात तो फोन दुसऱ्यांच्या मोबाईलचा वापर करून होतो. त्यांच्याकडे दोन -दोन मोबाईल आहेत. एक क्रमंाक त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर किंवा मित्राच्या नावावर आहे. सोबतच अवैध धंदेवाल्यांसाठी तो नंबर वापरला जातो. कोठे अवैध धंद्यावर धाड टाकली तर 20 हजार, 50 हजार, 1 लाख रुपये लुटतात आणि जप्ती पंचनाम्यामध्ये 1200, 1500 आणि 2000 रुपये दाखवले जातात. तेंव्हा खरे अवैध धंदे चालविणारे हे दोन जण आहेत. एपीआय संकेत दिघे आणि पोलीस अंमलदार शिवाजी गंगाधर पाटील. पोलीस उपमहानिरिक्षक साहेबांनी याबद्दल सविस्तर चौकशी करून पोलीस ठाण्यात नेमणुकीची लाईकी नसतांना त्यांना मिळालेले पोलीस ठाणे काढून त्यांच्याविरुध्द तात्काळ कार्यवाही करावी असे या अर्जात लिहिले आहे.