नांदेड (प्रतिनिधी)- हिंदू धर्माच्या भगवान हनुमंताविरूद्ध व्हॉट्सऍप स्टेटसमध्ये चुकीचे चित्रफीत प्रसारीत करणार्या एका प्रसार माध्यमाच्या व्यक्तीविरूद्ध बिलोली पोलिसांनी गुन्हा दाखल केल आहे.
बिलोली येथील रहिवाशी साईनाथ हनुमंतराव खंडेराय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची हिंदू धर्मियातील देव भगवान हनुमंत यांच्यावर अपार श्रद्धा आहे. शेख ईलियास शेख अख्तर रा. हेंगणी ता. बिलोली जि. नांदेड या प्रसार माध्यमामध्ये काम करणार्या एका व्यक्तीने २५ एप्रिल रोजी एक चित्रफीत प्रकाशीत केली. ती व्हॉटसऍप या संकेतस्थळावरून व्हायरल केली. या चित्रफीतीमध्ये दिसणार्या वानराची तुलना भगवान हनुमंतासोबत करून दोन समाजांमध्ये धर्मातील शत्रूभाव वाढविण्याच्या दृष्टीने आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या हेतूने हा भगवान हनुमंतांच्या नावावर व्हिडीओ प्रसारीत केला. हा घटनाक्रम २५ एप्रिलच्या दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. बिलोली पोलिसांनी या प्रकरणी शेख ईलियास शेख अख्तर रा. हेंगणी ता. बिलोली या व्यक्तीविरूद्ध भारतीय दंड संहितेचे कलम १५३(अ), २९५ आणि २९८ नुसार गुन्हा क्र. ९६/२०२२ दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.