नांदेड(प्रतिनिधी)-अपर पोलीस अधिक्षक भोकर कार्यालयाच्या हद्दीतील ईस्लापूरच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाविरुध्द दोन लाखांची लाच मागून 50 हजार रुपये लाच स्विकारण्याची तयारी दाखवली म्हणून आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागण्याची गुन्हा दाखल केला आहे. वृत्तलिहिपर्यंत सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांना अटक मात्र झाली नव्हती.
दि.22 एप्रिल रोजी एका तक्रारदाराने तक्रार दिली की, त्याच्या भावाचे नाव गुटख्याच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दोन लाख रुपये लाच मागत आहेत. या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 23 एप्रिल रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली तेंव्हा तडजोडीनंतर 50 हजार रुपये लाच स्विकारण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांनी मान्य केले होते. त्याअनुशंगाने आज पोलीस ठाणे ईस्लापूर येथे गुन्हा क्रमांक 43/2022 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांनी 50 हजारांची लाच स्विकारण्याचेे मान्य केले म्हणून दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे हे करीत आहेत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे, पोलीस अंमलदार हनुमंत बोरकर, एकनाथ गंगातीर, जगन्नाथ अंतवार, सचिन गायकवाड, प्रकाश श्रीरामे, अंकुश गाडेकर, मारोती सोनटक्के यांनी पार पाडली.
शंकर डेडवाल यांच्या विरुध्द झालेल्या कार्यवाहीची माहिती देतांना सोबतच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवरील बोलणे, एसएमएस, ऑडीओ, असल्यास तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असल्यास आणि माहिती अधिकारी कायद्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती द्यावी यासाठी टोल फ्री क्रमांक 1064(2) कार्यालयाचा फोन क्रमांक 02462-253512, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 यावर सुध्दा माहिती देता येईल सोबतच शासनाच्या संकेतस्थळावर, महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर, फेसबुक पेजवर सुध्दा भ्रष्टाचारा संबंधीची माहिती देता येईल.

बातमी लेखण छान केलय.