ताज्या बातम्या नांदेड

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात शांतता टिकुन रहावी यासाठी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 अन्वये आदेश निर्गमीत केला आहे. या आदेशानुसार जिल्हयात सर्व पोलीस स्टेशनचे स्वाधीन अधिकारी असलेले अंमलदार किंवा वरीष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम “अ” ते “ई” प्रमाणे पुढील लेखी किंवा तोंडी आदेश आपआपले हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. हा आदेश दिनांक 12 ते 30 एप्रिल 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यत लागु राहील.

आदेशात म्हटले आहे, रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्या रीतीने चालावे कोणत्या रितीने वागावे ते फर्माविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजे अर्चेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नांनाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकुमापेक्षा कमी दर्जाचे व त्या पुष्टी देणारे दुय्यम अधिकाऱ्यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शनपर आदेश देण्याबाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना देण्यासंबंधी.

कोणीही हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्हयात जाहीर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. जाहीर सभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बांधा येऊ शकतो अशा घोषणा देऊ नयेत.

हा आदेश लग्नांच्या वरातीस, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तो महाराष्ट्र पोलीस कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *