नांदेड,(प्रतिनिधी)- दुसऱ्याची पत्नी प्रेमिका बनवून ती परत नवरा व मूलांकडे जात असतांना दगडाने ठेचून तीचा खून करणाऱ्या प्रियकराला भोकर पोलीसांनी अटक केली आहे.
सखाराम जगरुप आडे वय 43 वर्षे, व्यवसाय- मजुरी( वेटर) जात- बंजारा रा. शिवनी ता.किनवट जि.नांदेड ह.मु.चिखलवाडी भोकर ता.भोकर जि.नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनूसार त्यांची पत्नी शोभाबाई भ्र. सखाराम आडे वय 40 वर्षे हीचे आणि सुरेश बळीराम आडे वय 35 वर्षे, रा. शिवनी ता. किनवट जि.नांदेड याच्या सोबत प्रेम संबंध होते.सुरेश आडे तीला सोबत घेवून गेला होता.24 एप्रिल रोजी ती परत माझ्या कडे येणार असतांना सुरेश आडेने तीला नवरा व मुलांकडे जाण्यास मज्जाव केला.तसेच तीला रायखोड शिवारातील बाबुराव टेकाळे याचे शेताजवळील नाल्यात दगडाने ठेचून तीचा खून केला आहे. या तक्रारी नूसार भोकर पोलीसांनी सुरेशआडे विरुध्द गुन्हा क्रमांक 146/2022 कलम 302 ,504, 506 भादवी प्रमाणे दाखल केला आहे. सध्या सुरेश आडे भोकर पोलीसांच्या अटकेत आहे.पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक तांबोळी अधिक तपास करीत आहे.खूनाचा प्रकार आज 25 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता समोर आला.