वजिराबाद पोलीसांनी प्रसारीत केली शोध पत्रिका
नांदेड(प्रतिनिधी)- एक 24 वर्षीय महिला आपल्या एका पाच वर्ष व 3.5 वर्ष वय असलेल्या दोन मुलांना घेवून घरातून निघून गेली आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाखल असलेल्या मिसींग क्रमांक 7/2022 नुसार पोलीसांनी शोध पत्रीका जारी केली आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्यात दि.21 एप्रिल रोजी दाखल झालेल्या मिसींग क्रमांक 7/2022 नुसार 24 वर्षीय महिला सारीका शिवा सौदा ही आपल्या दोन लहान लेकरांना घेवून घरातून 15 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता सासुरवाडी, वसमत येथे जाते म्हणून निघाली पण ती सापडली नाही. याबाबतची तक्रार सुनिल बन्सी वेद यांनी दिली. त्यानुसार मिसींग क्रमांक 7/2022 दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा तपास पोलीस अंमलदार बाबूराव डवरे आणि पोलीस अंमलदार अंकुश पवार पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
घरातून निघुन गेलेल्या सारीका शिवा सौदा (वय 24) या महिलेचा रंग गोरा आहे. चेहरा लांबट आहे. उंची 4 फुट 5 इंच आहे. शारीरिक बांधा मजबुत जाड आहे. घरून निघतांना तिने आकाशी निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. तिचे केस काळे आहे. तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. तिचे सोबत असलेला एक मुलगा 5 वर्षाचा आणि दुसरा 3.5 वर्षाचा आहे. या बालकांनी घरून जातांना काळ्या रंगाचे टी शर्ट व पांढऱ्या रंगाचा पॅन्ट परिधान केलेला आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, वरिल वर्णनाप्रमाणे आणि छायाचित्रांप्रमोण दिसणारी महिला व तिची दोन बालके कोणी पाहिली तर याबाबतची माहिती वजिराबाद पोलीस ठाण्यात द्यावी. वजिराबाद पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-236500, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांचा मोबाईल क्रमांक 9923696860 आणि पोलीस अंमलदार बाबूराव डवरे यांचा मोबाईल क्रमंाक 9923619820 असा आहे. दुरध्वनीवर किंवा मोबाईलवर सुध्दा जनतेला माहिती देता येईल.
