नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात विशेष पोलीस महानिरिक्षक ते पोलीस अधिक्षक दर्जाच्या एकूण 37 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने जारी केले आहेत. या आदेशावर गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
पिंपरी चिंचवड येथील पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना आता विशेष पोलीस महानिरिक्षक व्हीआयपी सुरक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुधार सेवा विभागातील विशेष पोलीस महानिरिक्षक अंकुश शिंदे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागातील विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके यांना सहपोलीस आयुक्त (गुन्हे) बृहन्मुंबई या पदावर नियुक्ती मिळाली आहे. बृहन्मुंबई येथील सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांना विशेष पोलीस महानिरिक्षक कायदा व सुव्यवस्था अशी नियुक्ती देण्यात आली आहे. ठाणे शहरातील सहपोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना विशेष पोलीस महानिरिक्षक गुन्हे अन्वेषन विभाग पुणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. पुणे शहरातील सहपोलीस आयुक्त रविंद्र सिसवे यांना विशेष पोलीस महानिरिक्षक महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. सशस्त्रविभाग मुंबई येथील अपर पोलीस आयुक्त विरेंद्र मिश्रा यांना बृहन्मुंबईमधील उत्तर प्रादेशीक विभागाचे अपर पोलीस आयुक्त करण्यात आले आहे.
14 अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरिक्षक ही पदोन्नती देवून राज्य शासनाने त्यांच्या नवीन नियुक्त्या जारी केल्या आहेत. त्यांच्या नवीन नियुक्त्या कंसात लिहिलेल्या आहेत. लखमी गौतम -पोलीस उपमहानिरिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक मुंबई (विशेष पोलीस महानिरिक्षक आस्थापना, पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई), संदीप कर्णिक-अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई(सह पोलीस आयुक्त पुणे शहर), सत्यनारायण-अपर पोलीस आयुक्त वाहतुक बृहन्मुंबई(विशेष पोलीस महानिरिक्षक सागरी सुरक्षा), प्रविणकुमार पडवळ-अपर पेालीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई(सहपोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा बृहन्मुंबई), एस.जयकुमार-अपर पोलीस आयुक्त मिराभाईंदर(विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशासन पोलीस महासंचालक कार्यालय), निशीथ मिश्रा-अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा (विशेष पोलीस महानिरिक्षक दहशतवाद विरोधी पथक), सुनिल फुलारी-अपर पोलीस आयुक्त गुन्हे नागपुर शहर(विशेष पोलीस महानिरिक्षक मोटार वाहन परिवहन विभाग, पुणे ), संजय मोहिते -पोलीस उपमहानिरिक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई (विशेष पोलीस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र पद उन्नत करून), सुनिल कोल्हे- सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई (सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई उप उन्नत करून), दत्तात्रय कऱ्हाळे-अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग ठाणे शहर (सह पोलीस आयुक्त ठाणे शहर), प्रविण आर.पवार-अपर पोलीस आयुक्त प्रशासन ठाणे शहर (संचालक राज्य गुप्तवार्ता अकादमी पुणे), बी.जी.शेखर-पोलीस उपमहानिरिक्षक नाशिक परिक्षेत्र(विशेष पोलीस महानिरिक्षक नाशिक परिक्षेत्र पद उन्नत करून), संजय बावीसकर-पोलीस उपमहानिरिक्षक रा.रा.पोलीस बल पुणे (विशेष पोलीस महानिरिक्षक गुन्हे अन्वेषन विभाग पुणे), जयंतनाईक नवरे-पोलीस उपमहानिरिखक व्ही.आय.पी.सुरक्षा मुंबई (पोलीस आयुक्त नाशिक शहर), दिपक पांडे-बदली आदेशाधिन.
राज्यातील 11 निवड श्रेणीतील आयपीएस अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरिक्षक पदी पदोन्नती देवून त्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. परमजितसिंह दहिया-पोलीस उपआयुक्त परिमंडळ-3 बृहन्मुंबई (पोलीस उपमहानिरिक्षक दहशतवादी विरोधी पथक मुंबई), नि.वा.जैन पोलीस अधिक्षक उस्मानाबाद(अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग नागपूर शहर), राजेंद्र माने, उपायुक्त राज्यगुप्त वार्ता विभाग मुंबई(अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग ठाणे शहर), विनायक बी.देशमुख-पोलीस अधिक्षक जालना(अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ), महेश पाटील-पोलीस उपआयुक्त गुन्हे मिराभाईंदर(अपर पोलीस आयुक्त वाहतुक मुंबई), संजय बी.जाधव-पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक पुणे (अपर पोलीस आयुक्त प्रशासन ठाणे शहर), दिपक साकोरे-पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा मुंबई(पोलीस उपमहानिरिक्षक रा.रा.पोलीस बल पुणे), पंजाबराव उगले-पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे (अपर पोलीस आयुक्त सशस्त्र विभाग मुंबई), श्रीकांत पाठक-बदली आदेशाधिन(अपर पोलीस आयुक्त मिराभाईंदर), विजय पाटील -पोलीस उपआयुक्त परिमंडळ-4 बृहन्मुंबई (पोलीस उपमहानिरिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई), दत्तात्रय शिंदे-पोलीस अधिक्षक पालघर, अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई.
पोलीस अधिक्षक दर्जाच्या 6 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. अक्षय अशोक शिंदे-पोलीस उपआयुक्त नागपुर शहर(पोलीस अधिक्षक उस्मानाबाद), अतुल व्ही. कुलकर्णी-अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर(पोलीस अधिक्षक जालना), मनिष कलवानीया-पोलीस उपआयुक्त नागपुर शहर(पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण), निमित्य गोयल-पोलीस अधिखक औरंगाबाद ग्रामीण(समादेशक रा.रा.पोलीस बल गट-14 औरंगाबाद), राजा रामास्वामी-पोलीस अधिक्षक बीड (पोलीस उपायुक्त पुणे शहर), लता फड-बदली आदेशाधिन(पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक पुणे).
या अधिकाऱ्यांमधील नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले अधिकारी
बदली झालेल्या अधिकाऱ्यांबद्दल नांदेडमध्ये कार्यरत असणारे पोलीस अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत असलेले अधिकारी संदीप कर्णिक, सत्यनारायण, परमजितसिंह दहिया, सहाय्यक पोलीस अधिक्षक पदावर कृष्ण प्रकाश, सुहास वारके, प्रविणकुमार पडवळ,पोलीस उपअधिक्षक पदावर कार्यरत असलेले महेश पाटील, संजय जाधव असे आहेत.
