नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जबरी चोऱ्या घडल्या आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. धर्माबाद शहरात पावर केबर चोरीला गेले आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये 1लाख 85 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
संगीता माणिकराव पवार या 20 एप्रिल रोजी सकाळी आपल्या इतर मैत्रीणींसोबत मॉर्निंग वॉक करीत असतांना आनंद नगर ते भाग्यनगर जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या तीन आरोपीतांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे शॉर्ट गंठण किंमत 47 हजार रुपयांचे बळजबरीने तोडून पळून गेले आहेत. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळु गिते अधिक तपास करीत आहेत.
संध्या विनोद वाघमारे या 20 एप्रिल रोजी सकाळी मैत्रीणींसोबत मॉर्निंग वॉक करीत असतांना कॅनॉल रोड नालंदानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या पाठीमागून आलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे शॉर्ट गंठन 44 हजार रुपयांचे बळजबरीने हिसकावून नेले आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रेडेकर अधिक तपास करीत आहेत.
चेतनकुमार गोविंदप्रसाद बाहेती यांची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 11 एप्रील रोजी दुपारी 2 वाजता चोरीला गेली होती. त्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीसांनी दाखल केला आहे. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. पोलीस अंमलदार शेख इब्राहिम अधिक तपास करीत आहेत. नामदेव गणपतराव बोडेवार यांची दुचाकी गाडी 18 एप्रिल रोजी रात्री 10 ते 19 एप्रिलच्या पहाटे 7 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 45 हजार रुपये आहे. शिवाीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत. सदाशिव भोजाजी डुकरे यांची 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 20 एप्रिल रोजी सिडकोतून चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार संभाजी व्यवहारे अधिक तपास करीत आहेत.
सचिन साहेबराव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धर्माबादच्या बसस्थानकाजवळी एका मोबाईल टॉवरचे पॉवर केबल 80 मिटर लांब किंमत 14 हजार रुपयंाचे कोणी तरी 19 एप्रिलला चोरुन नेले आहे. धर्माबाद पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आबेद अधिक तपास करीत आहेत.
