ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्यात वाढ

नांदेड(प्रतिनिधी)- राज्य शासनाने शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतुक भत्ता दरात सुधारणा करण्याचा आदेश दिला आहे. पुर्वी असलेल्या दरांमध्ये झालेली वाढ शासकीय कर्मचाऱ्यांना आनंद देणारी आहे. या आदेशावर वित्त विभागाचे उपसचिव विनायक धोत्रे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.

राज्य शासनाच्या वित्त विभागाने आज 20 एप्रिल रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतुक भत्ता दरात सुधारणा करण्यात आली आहे. निवासस्थानापासून कर्तव्यस्थानापर्यंत प्रवासावरील खर्चाची भरपाई व्हावी म्हणून हा वाहतुक भत्ता दिला जातो. 1 जानेवारी 2016 पासून सुधारीत वेतन संरचना लागू झाली आहे आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या वाहतुक भत्यात वाढ करण्यात आली आहे. या शासन निर्णयात मागील 10 शासन निर्णय, शासन शुध्दीपत्रक, शासन पुरक पत्रक, केंद्र शासनाचे निर्णय असे संदर्भ जोडण्यात आले आहेत.

वाहतुक भत्यात नव्याने देण्यात आलेला निधी पुढील प्रमाणे आहे. ज्या शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतनस्तर एस-20 व त्या वरील आहे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समुह, नागपूर नागरी समुह आणि पुणे नागरी समुह यासाठी 5400 रुपये इतर ठिकाणी 2700 रुपये देण्यात येणार आहेत. एस-7 ते एस-19 या वेतन स्तरातील अधिकाऱ्यांना 2700 आणि 1350, एस.-1 ते एस.-6 वेतन स्तरातील लोकांना 1 हजार आणि इतर ठिकाणी 675 असा महागाई भत्ता देण्यात येणार आहे. हा वाहतुक भत्ता 1 एप्रिल 2022 पासून अंमलात येईल.

अंध, अस्थीव्यंगाने अधु, कण्याच्या विकाराने पिडीत आणि मुकबधीर व श्रवण शक्ती दोष असणाऱ्या शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुध्दा वाहतुक भत्यात वाढ करण्यात आली आहे. तो वाढी वाहतुक भत्ता पुढील प्रमाणे आहे. एस-20 व त्यावरील लोकांना मुंबई व इतर नागरी समुहांमध्ये 10800रुपये इतर ठिकाणी 5400 रुपये , एस.-7 ते एस-19 या वेतन स्तरातील अधिकाऱ्यांना अनुक्रमे 5400 रुपये व 2700 रुपये मिळणार आहेत. एस.-1 ते एस-6 या वेतनस्तरातील कर्मचाऱ्यांना 2250 रुपये आणि 2250 रुपये वाढीव वाहतुक भत्ता मिळणार आहे.

या निर्णयात कांही अटी आहेत. कर्तव्यस्थानापासून 1 किलो मिटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान एकत्र असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळणार नाही. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतुक सुविधा पुरवली आहे. त्यांना हा भत्ता मिळणार नाही. रजा, प्रशिक्षण, दौरा, इत्यादी कारणामुळे संपुर्ण कॅलेंडर वर्षात अनुउपस्थितीत असणाऱ्या त्या महिन्याचा भत्ता मिळणार नाही. शासन असेही आदेश देत आहे की, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील पुर्ण कालीक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना हा आदेश लागू राहिल. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांना योग्य फेरफारासह हे आदेश लागू राहतील. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतन मानानुसार वेतन घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांनाही हा आदेश लागू करण्यात येतो असे या आदेशात लि हिले आहे. हा आदेश राज्य शासनाने संकेतांक 202204201255107205 नुसार राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्यात वाढ

नांदेड(प्रतिनिधी)- राज्य शासनाने शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतुक भत्ता दरात सुधारणा करण्याचा आदेश दिला आहे. पुर्वी असलेल्या दरांमध्ये झालेली वाढ शासकीय कर्मचाऱ्यांना आनंद देणारी आहे. या आदेशावर वित्त विभागाचे उपसचिव विनायक धोत्रे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.

राज्य शासनाच्या वित्त विभागाने आज 20 एप्रिल रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतुक भत्ता दरात सुधारणा करण्यात आली आहे. निवासस्थानापासून कर्तव्यस्थानापर्यंत प्रवासावरील खर्चाची भरपाई व्हावी म्हणून हा वाहतुक भत्ता दिला जातो. 1 जानेवारी 2016 पासून सुधारीत वेतन संरचना लागू झाली आहे आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या वाहतुक भत्यात वाढ करण्यात आली आहे. या शासन निर्णयात मागील 10 शासन निर्णय, शासन शुध्दीपत्रक, शासन पुरक पत्रक, केंद्र शासनाचे निर्णय असे संदर्भ जोडण्यात आले आहेत.

वाहतुक भत्यात नव्याने देण्यात आलेला निधी पुढील प्रमाणे आहे. ज्या शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतनस्तर एस-20 व त्या वरील आहे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समुह, नागपूर नागरी समुह आणि पुणे नागरी समुह यासाठी 5400 रुपये इतर ठिकाणी 2700 रुपये देण्यात येणार आहेत. एस-7 ते एस-19 या वेतन स्तरातील अधिकाऱ्यांना 2700 आणि 1350, एस.-1 ते एस.-6 वेतन स्तरातील लोकांना 1 हजार आणि इतर ठिकाणी 675 असा महागाई भत्ता देण्यात येणार आहे. हा वाहतुक भत्ता 1 एप्रिल 2022 पासून अंमलात येईल.

अंध, अस्थीव्यंगाने अधु, कण्याच्या विकाराने पिडीत आणि मुकबधीर व श्रवण शक्ती दोष असणाऱ्या शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुध्दा वाहतुक भत्यात वाढ करण्यात आली आहे. तो वाढी वाहतुक भत्ता पुढील प्रमाणे आहे. एस-20 व त्यावरील लोकांना मुंबई व इतर नागरी समुहांमध्ये 10800रुपये इतर ठिकाणी 5400 रुपये , एस.-7 ते एस-19 या वेतन स्तरातील अधिकाऱ्यांना अनुक्रमे 5400 रुपये व 2700 रुपये मिळणार आहेत. एस.-1 ते एस-6 या वेतनस्तरातील कर्मचाऱ्यांना 2250 रुपये आणि 2250 रुपये वाढीव वाहतुक भत्ता मिळणार आहे.

या निर्णयात कांही अटी आहेत. कर्तव्यस्थानापासून 1 किलो मिटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान एकत्र असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळणार नाही. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतुक सुविधा पुरवली आहे. त्यांना हा भत्ता मिळणार नाही. रजा, प्रशिक्षण, दौरा, इत्यादी कारणामुळे संपुर्ण कॅलेंडर वर्षात अनुउपस्थितीत असणाऱ्या त्या महिन्याचा भत्ता मिळणार नाही. शासन असेही आदेश देत आहे की, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील पुर्ण कालीक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना हा आदेश लागू राहिल. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांना योग्य फेरफारासह हे आदेश लागू राहतील. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतन मानानुसार वेतन घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांनाही हा आदेश लागू करण्यात येतो असे या आदेशात लि हिले आहे. हा आदेश राज्य शासनाने संकेतांक 202204201255107205 नुसार राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *