नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक, भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक, वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा 1 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. मौजे हळदा ता.भोकर येथून 20 हजार रुपयांची चोरी झाली आहे.
दि.7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते रात्री 11.30 यावेळेदरम्यान विश्र्वकर्मानगर भोकर येथून एम.एच.26 एक्स 5208 ही 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली. गणपत केरबाजी वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पांढरे अधिक तपास करीत आहेत.
शेख रशिद रियाज अहेमद यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एम.4718 ही 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 14 एप्रिलच्या सायंकाळी 7 वाजता दिपनगर पाटी जवळून चोरीला गेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार मंगनाळे अधिक तपास करीत आहेत.
14 एप्रिलला सरकारी दवाखाना परिसरातून साईनाथ वसंतराव मोरे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एफ.8294 सकाळी 9.30 वाजता चोरीला गेली. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार ईजळकर अधिक तपास करीत आहेत.
मौजे हळदा ता.भोकर येथे 13 एप्रिलच्या मध्यरात्री 3 वाजता साईटवरील सहा टीआरएस कार्ड किंमत 20 हजार रुपयांची कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार मधुकर रमेश गायकवाड यांनी दिली. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार कदम हे करीत आहेत.
