नांदेड(प्रतिनिधी)-दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त तयार करतांना बनावट कागदपत्र वापरणाऱ्या 53 जणांविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुय्यम निबंधक राजेश्र्वर वसंतराव मोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 या दरम्यान गोविंद हरीभाऊ पवार व इतर 52 जणांनी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त तयार करतांना खोटे कागदपत्र खरे आहेत असे भासवून त्यांचा वापर केला आणि बनावट कागदपत्राच्या आधारे दस्तनोंदणी केली. शिवाजीनगर पोलीसांनी याप्रकरणी 53 जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 132/2022 420, 465, 467, 468, 470, 471, 34 आणि भारतीय नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम 82 आणि 83 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुभाष माने यांच्याकडे देण्यात आला आहे. हा सर्व प्रकार बनावट एनए कागदपत्र तयार करून दस्तनोंदणी करण्यात आलेला आहे.
