ताज्या बातम्या नांदेड

वजिराबाद पोलीसांनी गावठी पिस्टल आणि दुसरे खोटे पिस्टल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी काल रात्री गुन्हेगारांची तपासणी करतांना दोन जणांकडून एक बनावट बंदुक आणि एक गावठी कट्टा जप्त केला आहे. दोघांविरुध्द दोन स्वतंत्र भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका व्यक्तीकडून चोरीची दुचाकी सुध्दा जप्त झाली आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदशी भंडरवार यांच्या मार्गदर्शनात वजिराबाद येथील गुन्हे शोध पथक शहरातील अनेक जागी रात्रीच्यावेळी कोणी अग्नीशस्त्र घेवून फिरत आहे काय याचा शोध घेत असतांना कृष्णा मनोहर गजभारे (25) रा.धनगरवाड विष्णुपूरीजवळ नांदेड याच्याजवळ विचारणा केली असता त्याच्या कंबरेला एक अग्नीशस्त्रासारखे दिसणारे पिस्टल सापडले. मुळात हे खोटे पिस्टल आहे पण या आधारावर हा गंभीर गुन्हे करण्याच्या तयारीने फिरत होता असा पोलीसांना कयास आहे. वजिराबाद पोलीसांनी कृष्णा गजभारेविरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 6/25 नुसार गुन्हा क्रमांक 108/2022 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार साहेबराव आडे अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत भगतसिंघ रस्त्यावर एक व्यक्ती कंबरेला पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास पकडण्यात आले. त्याचे नाव प्रेमसिंघ उर्फ प्रेम धरमसिंघ रामगडीया (20) रा.अबचलनगर नांदेड यास पकडले. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल सापडले. पोलीस अंमलदार गजानन किड्डे यांच्या तक्रारीवरुन प्रेमसिंघ विरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक 109/2022 भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मंठाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. प्रेमसिंघ रामगडीयाकडून लिंबगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 53/2022 मध्ये चोरीला गेलेली दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
हे दोन्ही प्रकरण वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, शेख इमरान, व्यंकट गंगुलवार, संतोष बेल्लूरोड तसेच सायबर विभागातील पोलीस अंमलदार यांनी हाताळले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *