ताज्या बातम्या नांदेड

नोंदणीदस्त तयार करतांना बनावट कागदपत्र वापरणाऱ्या 13 जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी दस्त तयार करतांना बनावट कागदपत्र वापरून, ते खोटे आहेत हे माहित असतांना खरे आहेत असे भासवून त्यांचा वापर करणाऱ्या 13 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेतील अनेक कलमांसह भारतीय नोंदणी अधिनियम 1908 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालती विठ्ठलराव नुसते ह्या प्रभारी दुय्यम निबंधक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महेश भास्करराव शंखतिर्थकर रा.यशवंतनगर नांदेड, सौ.अर्चना गोविंदराव सातपुते रा.दत्तनगर, आबाजी गणपतराव मनदुमले रा.मुतनाळ ता.बिलोली, आनंदराव किशनराव येलमटवार रा.पाटनूर ता.अर्धापूर स्वरुपा राणी दिपक देवतराज रा.यशवंतनगर, प्रबुध्द भारत श्रावण बनसोडे रा.महसुल कॉलनी तरोडा, उमाकांत लालू बोडेवाड रा.शक्तीनगर नांदेड, सदानंद विनायकराव बुटले रा.लोणी (बु)ता.अर्धापूर, किरण नरहरी वट्टमवार रा.सुनेगाव ता.लोहा, मंगला उर्फ विंद्या विलासराव मामीडवार रा.वात्सल्यनगर सिडको, विनोदकुमार विठ्ठलराव श्रीरामवार, रा.यशवंतनगर नांदेड, दैवशालाबाई बळीराम खोंडे, रा.जयमल्हार चौक तरोडा, किरण सूर्यकांत पटणे रा.विनायकनगर नांदेड या सर्वांनी दुय्यम निबंधक कार्यालयात स्वत:च्या फायद्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून, ते खोटे आहेत हे माहीत असतांना खरे म्हणून  वापरले आणि दुय्यम निबंधक कार्यालयाची दिशाभुल केली. हा सर्व प्रकार तपासणी पथकाने समोर आणला. त्यावरुन मी तक्रार देत आहे.
विमानतळ पोलीसांनी याबाबत 13 जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 131/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 470, 471, 34 आणि भारतीय नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम 82 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जाधव यांच्याकडे देण्यात आला. या सर्व प्रकार बनावट एनए कागदपत्र तयार करण्याचा आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *