आ.प्रशांत बबं यांनी सांगितलेले 100 टक्के खोटे नाही असे सांगायला वाव
नांदेड(प्रतिनिधी)-गुर-ता-गद्दी सोहळा संपून आज 14 वर्ष पुर्ण झाली असतांना त्या सोहळ्याच्या नावावर पुन्हा एकदा भुसंपादन, रस्त्याचे बांधकाम अशी एक अधिसुचना प्राप्त झाली. त्यावरुन काही दिवसांपुर्वीच आ.प्रशांत बंब यांनी नांदेड संदर्भात जे कांही सांगितले होते, ते 100 टक्के चुक नाही असे म्हणायला वाव मिळाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दि.15 फेबु्रवारी 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेली भुमिसंपादन पुर्नवसन व पुर्नस्थापना करतांना उचीत नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 नुसार अधिसुचना (कलम 19) प्राप्त झाली या अधिसुचनेवर क्रमांक 2022/ आर.बी./डेस्क-3/भुसं/टी.आर. 09 असा लिहिलेला आहे. या अधिसुचनेत उपजिल्हाधिकारी भुसंपादन यांचे 2021 चे पत्र संदर्भीत करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये कामठा (खु) जि.नांदेड येथील जमीन भुसंपादनाचा विषय लिहिलेला आहे. हे सार्वजनिक प्रयोजनाचे काम कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड या विभागाच्या खर्चाने करण्याची आवश्यकता या अधिसुचनेत लिहिली आहे.
संपादीत करावयाच्या जमीनीचे वर्णन ज्या कागदात दाखवले आहे. त्यावर जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांची स्वाक्षरी आहे. त्यामध्ये गावाचे नाव मौजे कामठा (खु) ता.जि.नांदेड असे लिहिले आहे. भुसंपादन करावयाचे पाच गट या कागदात दाखविण्यात आले आहे. त्यामध्ये गट क्रमांक 185, 226, 226, 229 आणि 230 ही आहेत. या गटांमधील भुसंपादीत करण्यात येणारी जमीन हेक्टर .आर मध्ये अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.0.01, 0.015, 0.015, 0.03, 0.13, असे एकूण 0.20 क्षेत्र भुसंपादन करायचे आहे. सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत त्याचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. प्रकल्पाचे नाव-भुसंपादन प्रस्ताव गुर-ता-गद्दी सोहळा वळण रस्ता परिक्रमामार्ग-2 (देगलूर नाका ते आसनापुल)मौजे कामठा (खु) ता.जि.नांदेड , प्रकल्पाच्या कामाचे वर्णन प्रकल्पाच्या नावाप्रमाणेच लिहिलेले आहे. समाजाला होणारे लाभ-दळण-वळण व पायाभुत सुविधा असे या कागदात लिहिले आहे. या जमीनीच्या नकाशाचे निरीक्षण उपजिल्हाधिकारी भुसंपादन पातलसिका-2 नांदेड यांच्या कार्यालयात करता येईल. शासनाच्या संकेतस्थळावर सुध्दा ही अधिसुचना भुसंपादनासाठी जारी झाली आहे. त्यावर 3 मार्च 2022 अशी तारीख आहे.
नांदेड शहरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपला जबाब देण्यासाठी आलेल्या आ.प्रशांत बंब यांनी भरपुर कांही नांदेडबद्दल सांगितले होते. त्याला जोडून या नवीन भुसंपादन अधिसुचनेला पाहिले असता एकूण 0.20 जमीनीचे भुसंपादन गुर-ता-गद्दी सोहळा संपल्यानंतर 14 वर्षानंतर का करण्यात येत आहे. तसेच यामध्ये गट क्रमांक 226 दोन वेळा लिहिलेले आहे. तसेच हे काम नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार आहे हे सर्व वाचल्यानंतर नक्कीच असे म्हणायला वाव आहे की, आ.प्रशांत बंब यांनी जे कांही नांदेडबद्दल, नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल आणि अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्याबद्दल जे कांही सांगितले ते 100 टक्के खोटे नक्कीच नाही.