नांदेड(प्रतिनिधी)-वडीलांना दारु का पितोस अशी विचारणा केल्यानंतर वडीलांनी मुलाला एक कानशिळात लगावली. याच्या रागात मुलाने वडीलांचा खून केल्याचा प्रकार नांदगाव तांडा ता.किनवट येथे घडला आहे.
रमेश पुंडलिक आडे रा.नांदगाव तांडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या घरात त्यांचे वडील पुंडलिक विठ्ठल आडे (42) हे दारु पित असतांना दुसरा मुलगा किशोर पुंडलिक आडे (21) हा घरात आला आणि त्याने वडीलांना प्रश्न विचारला की, दारु का पितोस, दारु पिऊन आईला का त्रास देतोस या विचारणेमुळे पुंडलिक आडे यांना राग आला. रागात त्यांनी आपला मुलगा किशोरच्या कानशिळात लगावली. कानशिळामागे आवाज आल्यानंतर किशोरने आपले वडील पुंडलिक यांना जमीनीवर पाडून घरात ठेवलेले किटकनाशक पाजण्याचा प्रयत्न केला. ते किटक नाशक तोंडात गेले नाही तेंव्हा किशोर आडेने लाकडी दांडा हातात घेतला आणि त्याने आपले वडील पुंडलिक आडे यांच्या डोक्यात तो लाकडी दांडा मारुन त्यांचा खून केला. ईस्लापूर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 40/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांच्याकडे देण्यात आला आहे.
