नांदेड(प्रतिनिधी)-आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने दिनांक 11 ते 14 एप्रिल 2022 दरम्यान जमशेदपूर झारखंड येथे आयोजित पहिल्या खेलो इंडिया महिला राष्ट्रीय रॅंकिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून नांदेडची सुवर्णकन्या कुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंडची निवड झाली आहे.
नुकतेच 22 ते 27 मार्च 2022 दरम्यान जम्मू कश्मीर येथील एम ए स्टेडियमवर आयोजित 41 व्या वरिष्ठ गटाच्या स्पर्धेतील उच्चतम कामगिरीमुळे सृष्टीची निवड झाली असून नव्यानेच स्पेशल महिलांसाठी आयोजित पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रातून सहभागी होण्याचा मान सृष्टीने मिळवला आहे. तिच्या या यशात सर्वात मोठा वाटा नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन, रमेश चौरे प्रशिक्षिका तथा तिची आई वृषाली पाटील जोगदंड यांचा असल्याचे सृष्टीने सांगितले.तिच्या या यशाबद्दल तिचे ऑलिम्पिक प्रशिक्षक रविशंकर सर भारतीय धनुर्विद्या संघटनेचे महत्त्व शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद चांदूरकर ,ब्रिजेश कुमार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर , डॉ. हंसराज वैद्य ,सृष्टीच्या महाविद्यालयाचे संचालक आमदार तुषार राठोड , बाबू गंधपवार , मनोहर सूर्यवंशी ,नांदेड जिल्हा ऑलिम्पिक संघटना अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेश पारे ,उपाध्यक्ष जनार्दन गोपीले , डॉ. रमेश नांदेडकर विक्रांत खेडकर , डॉ .राहुल वाघमारे , प्रवीण कुपटीकर , रामन बैनवाड , राजेश जांभळे , जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार , पाठक गुरुजी सिंग संधू अनील बंदेल, शिवकांता देशमुख ,सोनल बुंदेले, प्रविण गडदे, अभिजीत दळवी, डबल छत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे लता कलवार, सुरेश पांढरे अशोक मोरे ,शिवाजी केंद्रे मालू कांबळे ,संपादक नेताजी जाधव ,संजय चव्हाण ,संजय उदावंत राजेश पाटील इंगोले राजेंद्र सुगावकर ,रंगराव साळुंके दर्शन राजूरकर , विक्रांत हटकर ,शंकर जाधव पुरुषोत्तम कामतीकर , डॉ. सिंकूकूमार सिंग ,विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ . विठ्ठल सिंह परिहार ,गंगालाल यादव ,अनंत बोबडे ,जयपाल रेड्डी ,लक्ष्मण फुलारी, अवतारसिंग रामगडिया,डॉ . भिमसिंग मुनीम ,डॉ.पंकज मनियार, ज्योती चौसाळकर, सुशिल दिक्षित ,नारायण गिरगावकर ,मुन्ना कदम , आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
