ताज्या बातम्या नांदेड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा-प्रमोद शेवाळे

नांदेड(प्रतिनिधी)-महामानव, घटनचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिनी, 14 एप्रिल 2022 रोजी शहरातील अनेक रस्ते बंद राहणार आहेत. जनतेने पर्यायी मार्गांचा अवलंब करून आपला त्या दिवशीचा प्रवास करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले आहे.

दि.14 एप्रिल महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शहरातून डॉ.आंबेडकरपुतळ्यापर्यंत अनेक मिरवणूका येतात. त्यामुळे शहरातील बरेच रस्ते बंद करण्यात आले आहेत. हा आदेश 14 एप्रिलच्या सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
वाहतुकीकरीता बंद असलेले मार्ग
जुना मोंढा, देना बॅंक, महाविर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आयटीआय चौक, श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर दोन्ही मार्ग, जाण्या येण्या करता पुर्णपणे बंद राहतील. वर्कशॉप, श्रीनगरा, आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौक, शिवाजी पुतळा ते रेल्वे स्थानक, डॉ.आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाणारा मार्ग जाण्या-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहिल. सिडको, हडको, लोहा, सोनखेड ते जुना मोंढाकडे येणारा रस्ता पुर्णपणे बंद राहिल. यात्रीनिवास चिखलवाडी कॉर्नर ते महाविर चौककडे येणारा रस्ता फॉरेस्ट कार्यालयापासून पुर्णपणे बंद राहिल. बाफना टी पॉईंट, कविता हॉटेल, भगतसिंघ चौक मार्ग जुना मोंढाकडे येणारा रस्ता भगतसिंघ चौकापासून पुर्णपणे बंद राहिल. नायगाव, नरसी, वाजेगावकडून येणारी वाहने हिंगोली गेटपर्यंत येवू शकतील. हिंगोलीगेटपासून पुढे हा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहिल. टिळकनगर चौक ते भाग्यनगर कमान ते वर्कशॉप जाणारा येणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहिल. पावडेवाडी नाका ते शासकीय विश्रामगृह जाणारा रस्ता बंद राहिल. गणेशनगर, वायपॉईंट फुलेमार्केट जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहिल. चिखलवाडी कॉर्नर (गांधी पुतळा) ते शिवाजी पुतळ्याकडे जाण्या-येण्याचा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहिल.
14 एप्रिल रोजी पर्यायी वाहतुक मार्ग
बर्की चौकापासून जुना मोंढाकडे येणारी वाहतुक हबीब टॉकीजपासून महमद अली रोड मार्गे भगतसिंघ चौक ते बाफना टी पॉईंट या मार्गे हिंगोली गेटकडे वाहतुकीसाठी खुली राहिल. सिडको, हडको, लोहा, सोनखेडकडून शहरात येणारी वाहतुक साई कमान, गोवर्धनघाट तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय, लालवाडी, खडकपुरा, शिवाजीनगर, पिवळीगिरणी, गणेशनगर वाय पॉईंट, पावडेवाडी नाका मार्गे मोर चौक, छत्रपती चौक ते कॅनॉल रोड बायपास अशी वाहतुक वळविण्यात आली आहे. राजनगर ते जुना मोंढाकडे जाणारी वाहतुक राज कॉर्नर, शिवमंदिर, पिरबुऱ्हाननगर चौक, टिळकनगर चौक, आनंद नगर नाईक चौक, अण्णाभाऊ साठे चौक अशी वळविण्यात आली आहे. तसेच नाईक चौक, महाराणा प्रताप चौक, नमस्मार चौक अशी वाहतुक वळविण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, 14 एप्रिलच्या सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेदरम्यान वाहतुकीतील हा बदल कायम राहिल. त्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील नागरीकांनी या पर्यायी रस्त्यांचा वापर करून सहकार्य करावे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *