नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली तालुक्यात शुल्ककारणावरून धक्काबुक्की करत मारहाण करून फिर्यादी आणि साक्षीदारांकडून एकूण 1 लाख 11 हजार 950 रुपयांची लुट करण्यात आली आहे.
बालाजी शेट्टीबा शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.9 एप्रिलच्या सायंकाळी 6.30 वाजता ते आपल्या मित्रांसह जेवण करून रुद्रापुर ते कासराळी व कासराळी ते नांदेडकडे मोटारसायकलवर जात असतांना ईजुळकंठे यांच्या शेताजवळ त्यांना अंकुश गुणाजी शेळके, पवन किशन गिरी आणि संतोष बाबुराव क्यातमोड सर्व रा.रुद्रापुर ता.बिलोली यांनी अडविले आणि मारहाण केली. त्यांच्याकडून आणि त्यांच्या साथीदारांकडून सोन्याची अंगठी, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 11 हजार 950 रुपयंाचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. बिलोली पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 86/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 323, 504, 506 आणि 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे हे करीत आहेत.