नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या दत्तमंदिराची दान पेटी फोडून 80 हजार रुपये लांबवल्याचा प्रकार रामनवमीच्या अदल्यारात्री घडला आहे.
शहरातील नवा मोंढा भागातील दयानंदनगर भागात दत्त मंदिर आहे. आज रामनवमीच्या दिवशी सकाळी मंदिराची पुजा करण्यासाठी पुजारी मंडळी आली तेंव्हा त्यातील दान पेटी फोडलेली होती. दानपेटीतून जवळपास 80 हजार रुपये चोरीला गेले असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली आणि कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली.