ताज्या बातम्या नांदेड

जय श्री रामच्या घोषणांनी आसमंत दुमदुमले


 

 

नांदेड(प्रतिनिधी)- आज रामनवमीनिमित्त शहरभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी आजच्या रामनवमीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात उत्साह कायम रहावा यासाठी भरपूर मेहनत घेतली.

नांदेड शहरात आज रामनवमीनिमित्त आज भरपूर कार्यक्रम होते. जुन्या नांदेड भागात होळी येथे असलेल्या पुरातन राम मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती. अशीच काहीशी गर्दी जुना मोंढा भागातील राम मंदिरात होती. यशवंतनगर भागातील श्री राम मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच श्रीरामाचे दर्शन घेऊन आर्शीवाद प्राप्त केले. दुपारी 12 वाजता रामजन्म समय होताच आरती झाली आणि भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला.

शहरातील रेणुका माता मंदिरासमोर सकाळपासूनच रामजन्म मिरवणुकीची तयारी सुरू होती. त्यात अनेक भजन मंडळी होते. दुपारी 4 वाजता ही मिरवणुक रेणुका माता मंदिर येथून सुरू झाली आणि हळूहळू मार्गक्रमण ही मिरवणुक वृत्त लिहीपर्यंत वजिराबाद भागात पोहचली होती. या मिरवणुकीचा शेवट अशोकनगर भागातील हनुमान होत असते. या मिरवणूकीत आयोजकांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांना बिनतारी संदेश यंत्र दिलेले होते. मिरवणूकीच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत या बिनतारी संदेश यंत्राद्वारे आयोजक मिरवणूकीची सर्व पाहणी करत होते.

प्रभु श्री रामचंद्राच्या या जन्मोत्सव मिरवणूकीत आयोजकांनी भारत माता, भारतीय स्वातंत्र्यात आपले जीव बलिदान देवून आम्हाला स्वातंत्र्य दाखविणाऱ्या अनेकांचे छायाचित्र,गुरू गोविंदसिंघजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगवान झुलेलाल, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बसश्र्वेर महाराज यांचे छायाचित्र मिरवणूकीत लावून सर्व धर्म समभाव या संकल्पनेला जागा दिली. सोबतच प्रभु श्री राम, आई सिता, आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह हनुमान आणि हनुमानांचे अनेक सेवक असा देखावा होता. स्वतंत्रता सैनानी आणि इंग्रजांमधील चकमकीचा देखावा या मिरवणूकीत होता.

शहरभर अनेक जागी भाविकांनी मिरवणुकीतील लोकांसाठी भोजन, पाणी आदी सोय केली होती. अनेक ठिकाणी भोंगे वाजत होती. मागील दोन वर्षांपासून बंद असलेली रामनवमी मिरवणुक यंदा जोरदारपणे साजरी झाली. सकाळी काही लोकांनी रामनवमीनिमित्त एक बाईक रॅली आयोजित केली होती. मिरवणुकीत असंख्य रामभक्त युवक सहभागी झाले होते. मिरवणूकी असंख्य जागी महिला, युवती वृध्द मंडळी सर्वांनीच या दोन वर्षापासून मंदिर असलेल्या मिरवणूकीत सहभागी होवून आनंद घेतला. रामभजन, देशभक्ती गिते गात भजनीमंडळींनी भक्तांचा उत्साह वाढवला. अत्यंत उत्साहात रामजन्म साजरा करत आला. जय श्री रामच्या घोषणांनी आसमंत दुमदुमले. जुना मोंढा भागातील राम मंदिरातून सुद्धा दुपारी रथयात्रा काढण्यात आली. पोलीस उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, जगदीश भंडरवार, डॉ. नितीन काशीकर, सुधाकर आडे, अनिरूद्ध काकडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि असंख्य पोलीस अधिकाऱ्यांनी रामनवमी मिरवणुकीत भरपूर मेहनत घेतली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *