ताज्या बातम्या नांदेड

शुभंकरोती फाऊंडेशन सामाजिक संस्थेच्या कम्युनिटी सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न

नांदेड (प्रतिनिधी)- शुभंकरोती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या दशकपूर्ती दिनाचे औचित्य साधून कम्युनिटी सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

नांदेड जिल्ह्यातून सुरुवात झालेली शुभंकरोती फाऊंडेशन ही सामाजिक संस्था गेल्या १० वर्षात समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक मागास परिसरातील महिला व मुलींना समान हक्क,शिक्षण,आरोग्य व प्राबल्य मिळावे म्हणून सातत्याने प्रयत्न करीत आहे, या सामाजिक संस्थेच्या दशकपूर्ती दिनानिमित्त कम्युनिटी सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडला तसेच “स्वरविट्ठल” या भक्तिमय संगीताच्या मेजवानीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, “स्वरविठ्ठल” या भक्तिमय संगीताच्या कार्यक्रमाची निर्मिती सुप्रसिद्ध संगीतकार आनंदीविकास यांनी केले तर यांसोबत रविकुंज पांचाळ, विश्वास अंबेकर,शुभम कांबळे आदी गायक उपस्थित होते, विठ्ठलाची मूर्ती निर्मिती व्यंकट पाटील तर तैलचित्र रत्नदीप बारबोले यांनी रेखाटले . यावेळी भव्य आरोग्य शिबिराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे संचालक डॉ.घनश्याम येळणे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी.ए.डॉ.प्रवीण पाटील हे होते यानंतर कम्युनिटी सेंटरच्या शिलाई प्रशिक्षण विभागाचे उद्घाटन जीएसटी सहाय्यक आयुक्त एकनाथ पावडे , गारमेंट युनिटचे उद्घाटन सी.ए.डॉ.प्रवीण पाटील, सॅनिटरी नॅपकिन प्रकल्पाचे उद्घाटन बाळासाहेब पावडे तर पार्लर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध संगीतकार आनंदीविकास यांनी केले, यावेळी प्रास्ताविक तथा संस्थेच्या कार्याबद्दलची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धाराशिव शिराळे यांनी केले , यावेळी संस्थेचे संयोजन समिती सदस्य निशिकांत पाटील,निकिता पांडे,मुकेश पाटील टाकळीकर,स्वाती देशपांडे,लक्ष्मीकांत कामळजकर,सतीश महामुने,सोमेश देशपांडे,ज्योती सपकाळे,राहूलसिंग बिसेन,अदिती अहिरे,अभिषेक गिल,रितेश बनसोडे आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नियोजन समिती सदस्य कोमल केंद्रे,चित्रा चौधरी,अभिजीत बारडकर,ऋचा आयाचीत,गौरव वाळिंबे,अनघा छिद्रे,सबुरी जाधव,स्वप्नजा गोरे,रेश्मा राऊत,सोनाली पवार,संतोष फुले,विवेकानंद देशमुख,दिपाली ठाकूर,श्वेता धारासुरकर,रेणुका कुलकर्णी,निकिता पाटील आदींनी मेहनत घेतली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *