बिलोली पोलिसांचे जनतेला ओळख पटवण्यासाठी आवाहन
नांदेड,(प्रतिनिधी)- बिलोली तालुक्यातील मांजरा नदीच्या पात्रात एका ३५ वर्षीय अनोळखी माणसाचे प्रेत सापडले आहे. बिलोली पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की या अनोळखी माणसाची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे.
आज दिनांक ८ एप्रिल रोजी सगरोळी जवळच्या मांजरा नदी पात्रात एका ३५ वर्षीय अनोळखी माणसाचे प्रेत सापडले आहे.सगरोळीचे उप सरपंच विश्वनाथ माधवराव महाजन यांनी दिलेल्या खबरीनुसार बिलोली पोलिसांनी या अनोळखी माणसाच्या मृत्यू बाबत अकस्मात मृत्यू क्रमांक १४/२०२२ फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ प्रमाणे दाखल केला आहे.
बिलोलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी सांगितल्या प्रमाणे मयत अनोळखी माणूस ३५ वर्षांचा आहे.अंगात मळकट पांढरा शर्ट आणि काळा पँट परिधान केलेला आहे.त्या अनोळखी मयताच्या कमरेला करदोडा बांधलेला आहे.डोईफोडे यांनी जनतेला आवाहन केले आहे की,या अनोळखी मयताची ओळख पटवण्यासाठी जनतेने त्यांना काही माहिती असल्यास त्यांनी बिलोली पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचा मोबाईल क्रमांक ९८२३८८९०३७ असा आहे.