नांदेड येथून 5 जिल्हा न्यायाधीश जाणार आणि 5 येणार, 7 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जाणार आणि 7 येणार, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी 19 जाणार आणि 15 येणार
नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील 1013 न्यायाधीशांच्या सार्वत्रिक बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये 247 जिल्हा न्यायाधीश, 233 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि 533 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आदेशावर उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एम.डब्ल्यू चांदवाणी यांची स्वाक्षरी आहे. नांदेड जिल्ह्यातून 31 न्यायाधीश बदलून दुसरीकडे जाणार आहेत आणि 27 न्यायाधीश नांदेड जिल्ह्यात येणार आहेत.
राज्यातील 1013 न्यायाधीशांच्या बदल्यांमध्ये नांदेड येथून बदलून जाणारे जिल्हा न्यायाधीश आणि त्यांची नवीन नियुक्ती पुढील प्रमोण आहे. कमलकिशेार गौतम-औद्योगिक न्यायालय पुणे, कंधार येथील ए.एस.सलगर-सीटी सिव्हील कोर्ट मुंबई,कुटूंब न्यायालयातील एन.डी.खोसे-गोंदिया, मुखेड येथील एन.पी.त्रिभुवन-सीटी सिव्हील कोर्ट मुंबई, बिलोलीचे डी.आर.देशपांडे-संगमनेर जि.अहमदनगर, नांदेड येथे येणारे जिल्हा न्यायाधीश पुढील प्रमाणे आहेत. श्रीमती एम.ए.आनंद-पनवेल रायगड(कंधार), डी.ई.कोठालीकर-मुंबई(बिलोली), सी.व्ही.मराठे-मुंबई(नांदेड), श्रीमती एस.बी.महाले-मुंबई (कंधार), श्रीमती एस.पी.अग्रवाल-मुंबई(नांदेड कुटूंब न्यायालय).
नांदेड येथून बदलून जाणारे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात दिलेली आहे. विधीसेवा प्राधिकरण सचिव आर.एस.रोटे(अहमदनगर), सचिन सुर्यकांत पाटील(कामगार न्यायालय अमरावती), मुखेड येथील एस.टी.शिंदे (नागपूर), भोकर येथील एम.पी.पांडे(अहमदनगर), एम.पी.शिंदे (पुणे), मयुरा यादव (अमरावती), एम.बी.कुलकर्णी(नाशीक). नांदेड येथे येणारे नवीन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुढीलप्रमाणे आहेत. ए.ए.पाचभाई -मुंबई अंधेरी(भोकर), वाय.बी.गमे-मुंबई(मुखेड), श्रीमती ए.के.मांडवगडे-अहमदनगर (नांदेड), श्रीमती के.पी.जैन-सोलापूर(नांदेड), डी.एम.जज-नागपूर(नांदेड), आर.बी.राजा-वर्धा(नांदेड), श्रीमती आर.आर.लोहिया-वर्धा(नांदेड).
नांदेड येथून बदलून जाणारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पुढील प्रमाणे त्यांची नवीन नियुक्ती कंसात दिली आहे. पी.जी.तापडीया-नांदेड(पुणे), एस.जी.बर्डे-देगलूर (पुणे), डब्ल्यू.ए.सय्यद-नायगाव(सांगली), आर.आर.पत्की-बिलोली (ठाणे), एस.आर.कुलकर्णी-नांदेड (नाशिक), आर.पी.घोले-नांदेड(सहकार न्यायालय नाशिक), पी.जी.बारटक्के-देगलूर(बाभुळगाव यवतमाळ), पी.बी.तौर-लोहा(कल्याण ठाणे), एस.जी.शिंदे-मुखेड(कोल्हापूर), आर.बी.सौरेकर-नायगाव(कोल्हापूर), सुविधा पांडे-हदगाव(नंदुरबार), जी.सी.फुलझळके-नांदेड(मानगाव, रायगड), के.एम.चंडालिया-हिमायतनगर(सांगली), एन.एल.गायकवाड-नांदेड(सहाय्यक धर्मदाय आयुक्त ठाणे), पी.यु.कुलकर्णी-नांदेड (मालेगाव वाशीम), पी.के.धोंडगे-लोहा(सहायय्क धर्मदाय आयुक्त ठाणे), एन.ए.एन.मुद्दसर-नांदेड(वाशी ठाणे), एस.आर.बडवे -नांदेड(फलटन सातारा), एच.के.वानकर-नांदेड(सहकार न्यायालय सांगली).
नांदेड येथे येणारे नवीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पुढील प्रमाणे आहेत. ए.आर.मोहाने -दहीवडी सातारा(देगलूर), एम.आर.स्वानी-परांडा उस्मानाबाद(नांदेड),व्ही.व्ही. सावरकर-नागपूर (बिलोली), श्रीमती पी.एस.जाधव-खेड रत्नागिरी (नांदेड), के.आर.कोंडारे-तासगाव सांगली(हिमायतनगर), श्रीमती ए.एच.ठाकूर-फलटण सातारा (सहकार न्यायालय नांदेड), ए.व्ही. डाखोरे-मुंबई(लोहा), श्रीमती. आर.एन.खान-ईगतपुरी नाशिक (देगलूर), अश्र्विनी बी.पाटील-डहाणू ठाणे (नायगाव बाजार), एन.एस.बारी -मुुंबई(मुखेड), एस.बी.गावडे-कामठी नागपूर(माहूर), एस.एल.वैद्य-सिंदखेडा धुळे (लोहा), श्रीमती व्ही.व्ही.चौधरी-बल्लारपूर चंद्रपूर(सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड), एस.आर.पाटील-पुणे (हदगाव), आर.एम.लोलगे-रावेर जळगाव(नायगाव बाजार). नांदेड जिल्ह्यातून एकूण पाच जिल्हा न्यायाधीश जाणार आहेत पाच येणार आहेत. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सात जाणार आहेत सात येणार आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी 19 जाणार आहेत आणि 15 येणार आहेत. वाचकांच्या सुविधेसाठी उच्च न्यायालय मुंबईने जारी केलेल्या या तिनही पदाच्या पीडीएफ फाईल ट्रान्स्फर नावाने बातमीत जोडल्या आहेत.