नांदेड(प्रतिनिधी)-सिंधी ता.उमरी येथे काल दि.5 एप्रिल रोजी घडलेल्या दगडफेक प्रकरणात दोन गटांविरुध्द परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. एका गटाविरुध्द ऍट्रॉसिटी कायदा अंमलात आला आहे.
संदेश सुर्यकांत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता यात्रेमध्ये जात असतांना त्याच्यासोबत विनोद वाघमारे, बालाजी वाघमारे, रतन वाघमारे, विशाल वाघमारे, संजय वाघमारे नागेश वाघमारे, जयपाल गायकवाड, नरेंद्र गायकवाड, गणपती गायकवाड व शामराव वाघमारे हे होते. गावाजवळच 50 मिटर अंतरावर त्यांना विशाल वाघमारे आणि इतर मंडळी भेटली. त्यावेळी यात्रेत जाण्याविषयी चर्चा झाली आणि त्यात आमच्या यात्रेत जाण्याला विरोध झाला. संदेश गायकवाड हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. तरी पण त्यांना यात्रेत जावू न देण्यावरुन विरोध झाला आणि निवडणुक जिंकल्याचा रोष होता. यानंतर दगडफेक झाली आणि त्यात गणपती बालाजी गायकवाड (72) यांच्यासह अनेकांना मार लागला. कांही जणांनी जळत्या लाकडांनी मारले. सोबतच त्या सर्व लोकांनी अनुसूचित जातीच्या वस्तीवर सुध्दा दगडफेक केली. या तक्रारीमध्ये विकास वाघमारे, बालाजी महादु वाघमारे, प्रमोद कोलते, शिवाजी येंडाळे, नितीन येंडाळे, किशन येंडाळे, अगस्ती पुयड, शुभम पुयड, शाम पुयड, भगवान पुयड, प्रणव कवळे, एकनाथ पुयड, भास्कर कळमकर, योगेश पुयड, बाळु येंडाळे, अंकुश कवळे, रवि कदम, अमोल किशन पुयड, आकाश प्रभाकर कवळे, मधुकर कवळे, विलास किशन पुयड, दत्ता गोविंद शिंदे, किरण पुयड, नरेश धोंडीबा पुयड, गणेश धोंडीबा, शाम गोविंद पुयड अशी नावे मारहाण करणाऱ्यांची आहेत. या तक्रारीतील जखिशमी लोकांमध्ये गणपती बालाजी गायकवाड (72) यांच्यासह विनोद वाघमारे, गणपती गायकवाड, बालाजी वाघमारे, राजरत्न वाघमारे, संजय वाघमारे, गोविंद वाघमारे, विकास वाघमारे असे आहेत.
उमरी पोलीसांनी या प्रकरीण गुन्हा क्रमांक 92/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 148, 341, 336, 324, 323, 506 आणि ऍट्रॉसिटी कायदा कलम 3(1), 3(2) अशी कलमे जोडण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. याप्रकरणात पोलीसांनी अद्याप 14 जणांना अटक केली आहे.
या घटनेच्या संदर्भाने शिवानंद गोविंद भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संदेश गायकवाडने यात्रेमध्ये असलेल्या विविध कारणावरुन आणि रस्त्यावरून चालण्याच्या वादावरून भांडण झाले. त्यावेळी शिवानंद गोविंद भालेराव हे सुध्दा ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्या वादातून संदेश गायकवाड, त्याचे सहकारी विशाल वाघमारे, रतन वाघमारे, सजन वाघमारे यांनी आम्हाला मारहाण केली आणि भांडणाचा आवाज ऐकून अनुसूचित जातीच्या वस्तीतून विनोद कोलते, बालाजी कोलते, कोहीनुर वाघमारे, कांतराव गायकवाड, सुभाष वाघमारे, नागेश पवार, प्रविण वाघमारे, तुषार वाघमारे, अरुण वाघमारे, साहेबराव वाघमारे, विकास वाघमारे आणि दिगंबर वाघमारे या लोकांनी शिवानंद गोविंद भालेराव यांच्यासह इतरांना मारहाण केल्याचे लिहिले आहे. या तक्रारीवरुन उमरी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 93/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 504, 506, 294, 143, 147, 148, 149 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे.
