नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात नव्याने आलेल्या कांही पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या जारी करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी जारी केले आहेत.
नांदेड येथे कार्यरत पोलीस निरिक्षक नानासाहेब ज्ञानदेव उबाळे यांना सायबर सेल येथे नियुक्ती देण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक गजानन धोंडीबा सैदाने यांना डायल-112 कक्षात नियुक्ती देण्यात आली आहे. नवीन आलेल्या आठ सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पुढील प्रमाणे नियुक्त्या मिळाल्या आहेत. शिवसांब ईश्र्वर स्वामी-ईतवारा, श्रीधर भागवतराव जगताप-माहूर, दत्तात्रय गंगाधर मंठाळे-वजिराबाद, रामकृष्ण श्रीहरी पाटील-भाग्यनगर, आनंद प्रकाश माळाळे-देगलूर, सुभाष गोकुळ माने-शिवाजीनगर, किशोर बाबूराव बोधगिरे-मुखेड, रुपाली गौतम कांबळे-इतवारा. नवीन 9 पोलीस उपनिरिक्षकांना पुढीलप्रमाणे नियुक्ती देण्यात आली आहे. किशर रामा आडे-माळाकोळी, ताहेर अली जब्बारखान पठाण-उस्माननगर, रमेश साहेबराव गायकवाड-इतवारा, विठ्ठल हनुमंतराव घोगरे आणि मारोती सिराम दासरे-क्युआरटी पथक, हौसाजी लक्ष्मणराव मारकवाड-इतवारा, कोंडीबा बापूराव केजगिर-लिंबगाव, नरहरी त्र्यंबक फड,भारत रमेश जाधव-मुखेड.
