क्राईम ताज्या बातम्या

शिंदी ता.उमरी गावात अनुसूचित जातीच्या वस्तीवर तुफान दगडफेक

नांदेड(प्रतिनिधी)-ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार निवडूण आल्यानंतर या गावात दुमसत असलेला ज्वालामुखी आज फुटला आणि अनुसूचित जातीच्यावस्तीवर दुफान दगडफेक झाली अशी माहिती प्राप्त झाली आहे.

सायंकाळी ६ वाजेच्यासुमारास शिंदी ता.उमरी या गावात अचानकपणे अनुसुचित जातीच्या वस्तीवर दुफान दगडफेक झाली. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी शिंदी गावात पोहचले आहेत. उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी आपल्या सहकारी पोलीस अंमलदारांसह शिंदी गावात जावून घडलेल्या प्रकाराबद्दल दोषींवर अत्यंत कडक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली आहे. झालेल्या दगडफेकीमध्ये भरपूर जण जखमी झाले आहेत. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झालेली नव्हती. शिंदी गावात सध्या तरी तणावपुर्ण शांतता आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.