

नांदेड (प्रतिनिधी)- शुभंकरोती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या दशकपूर्ती दिनानिमित्त आज कम्युनिटी सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले आहे, या कम्युनिटी सेंटरमध्ये महिलांसाठी मोफत शिलाई , संगणक तथा पार्लर प्रशिक्षण केंद्र असून आसानी सॅनिटरी नॅपकीन निर्मिती प्रकल्पाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
नांदेड जिल्ह्यातून सुरुवात झालेल्या शुभंकरोती फाऊंडेशन या सामाजिक संस्था गेल्या १० वर्षात समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक मागास परिसरातील महिला व मुलींना समान हक्क,शिक्षण,आरोग्य व प्राबल्य मिळावे म्हणून सातत्याने प्रयत्न करीत आहे, उद्या या सामाजिक संस्थेच्या दशकपूर्ती दिनानिमित्त कम्युनिटी सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले आहे ,यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सी.ए.डॉ.प्रवीण पाटील तर उद्घाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु उद्धव भोसले , समाजसेविका तथा गोदावरी मल्टीस्टेट को. ऑप.बँकेचे अध्यक्ष राजश्री पाटील, महापौर जयश्री पावडे,आ.राम पाटील रातोळीकर,आ.राजेश पवार,आ.बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटनाचा कार्यक्रम उद्या दि.३एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता होणार असून त्याआधी सकाळी ९:०० वा. “स्वरविठ्ठल” हा भक्तिमय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे सर्वांना मनमोहून टाकणारी साक्षात श्री विठ्ठलाची मूर्ती व तैलचित्र कलाकृतीच्या माध्यमातून सर्व उपस्थितांसमोर घडविल्या जाणार आहे,या सोहळ्याचा याची देही याची डोळा आनंद घेण्यासाठी तसेच आरोग्य तपासणी शिबिरासाठी येण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किरण चौधरी व संयोजन समितीने केले आहे.