नांदेड(प्रतिनिधी)-एका 8 वर्षीय बालिकेसोबत 16 वर्ष 6 महिने वय असतांना अनैसर्गीक अत्याचार करणाऱ्या युवकाला ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाने नियमित न्यायालयाकडे वर्ग केल्यानंतर 5 वर्षानंतर त्या युवकाला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी 7 वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस ठाणे लिंबगावच्या हद्दीतील एका आईने दिलेल्या तक्रारीनुसार 26 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास त्या आणि त्यांचे पती शेती कामासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांची 8 वर्षीय बालिका शाळेतून घरी आली. आपले शाळेचे साहित्य घरात ठेवून ती आसपासच्या लेकरांसोबत खेळत असतांना कृष्णा चांदोजी सुर्यवंशी (त्या दिवशी वय 16 वर्ष 6 महिने ) याने त्या बालिकेला स्वत: उचलून आपल्या घरात नेले. तिच्यासोबत अनैसर्गिक पध्दतीने लैंगिक अत्याचार केला. आई घरी आल्यानंतर रक्ताने माखलेल्या शरिराला पाहुन आईने विचारणा केली तेंव्हा तिला जखमा झालेल्या होत्या. या बाबत 27 नोव्हेंबर 2016 रोजी पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील यांच्या समक्ष त्या आईच्या तक्रारीवरुन कृष्णा चांदोजी सुर्यवंशी विरुध्द लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 94/2016 भारतीय दंड संहितेच्या कलम 377, 376 (2)(1) आणि पोक्सो कायदा कलम 4 आणि 8 नुसार गुन्हा दाखल झाला.
अनेक उपाध्यांनी ज्यांना सन्मानित केले गेेले अशा तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री पंडीतरावजी कच्छवे साहेब यांनी या गुन्ह्याचा तपास करून कृष्णा चांदोजी सुर्यवंशी विरुध्द ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाकडे दोषारोपपत्र दाखल केले. या कायद्यात आलेल्या नवीन सुधारणेनंतर समितीने केलेल्या आध्यनानंतर हा गुन्हा नियमित न्यायालयाकडे वर्ग झाला. तो विशेष पोक्सो सत्र खटला क्रमांक 47/2017 नुसार न्यायालयात चालला. या खटल्यात एकूण 11 साक्षीदारांनी आपले जाबब नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी कृष्णा चांदोजी सूर्यवंशीला 8 वर्षीय बालिकेसोबत अनैसर्गीक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जाहीर केले. त्यानंतर कृष्णा सुर्यवंशी यास भारतीय दंड संहितेच्या कलम 377, 376(2)(1) प्रमाणे 7 वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड, कलम 377 साठी 3 वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड तसेच कलम पोक्सो कायद्याच्या कलम 7 आणि 8 नुसार तीन वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड अशा शिक्षा ठोठावल्या आहेत. सर्व शिक्षा आरोपीला एकत्रीत भोगाच्या आहेत. एकूण दंड 5 हजार रुपये आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड. एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी बाजू मांडली. लिंबगावचे पोलीस अंमलदार निवृत्ती रामबैनवाड यांनी पैरवी अधिकारी म्हणून या खटल्याच्या प्रवासात मेहनत घेतली.
