ताज्या बातम्या नांदेड

बिलियन डॉलर नोट प्रकरणात दोन आरोपी वाढले ; 5 जणांना चार एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-बिलियन डॉलर नोट प्रकरणात तीन आरोपीतांची पोलीस कोठडी आज संपतांना वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तेलंगणा राज्यातील आणखी दोघांना पकडून आणले. त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी पाच आरोपीतांची पोलीस कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवून दिली आहे.

स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 29 मार्च रोजी बिलियन डॉलरची नोट म्हणजे भारतीय चलनात 750 कोटी रुपयांची नोट 50 लाखांना विक्री करणाऱ्या 3 जणांना पकडले. त्यांची नावे महेश इलय्या येलूटला (30), नंदकिशोर गालरेड्डी देवरम(42), आनंदराव आयन्ना गुंजी (32) या तिघांना पकडले. त्यांच्याकडून एक चार चाकी गाडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. वजिरबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 91/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 399 प्रमाणे दाखल करण्यात आला. पकडलेल्या तीन आरोपीतांना न्यायालयाने 1 एप्रिल 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले.

पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची परवानगी घेवून पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार मनोज परदेशी, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लूरोड, व्यंकट गंगुलवार यांनी तेलंगणा राज्यातून आणखी दोन जण पकडून आणले. त्यांची नावे दशरथ भुमय्या कासी (29) जलेंदरसिंघ उर्फ बिल्ली हरभजनसिंघ गोकेटाक(32) यांना पकडून आणले. आज 1 एप्रिल रोजी आरोपीतांना न्यायालयासमक्ष हजर करून संजय निलपत्रेवार यांनी पोलीस कोठडी मागितली तेंव्हा न्यायाधीश एस.ए.खलाने यांनी ही पोलीस कोठडी 4 एप्रिल 2022 पर्यंत वाढवून दिली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *