नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरट्यांकडून जवळपास 2 लाखापेक्षा जास्त किंमतीच्या पाच दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, विठ्ठल शेळके, बालाजी तेलंग, देविदास चव्हाण, रवि बाबर यांच्या पथकाला गंगाधर उर्फ बाळ्या किशन जाधव (22) रा.हिमायतनगर, कृष्णा पांडूरंग माने (24) रा.मानकेश्र्वर ता.उमरखेड यास पकडले. त्यांच्याकडून 5 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत अंदाजे 2 लाख पेक्षा जास्त आहे. या पाच दुचाकी गाड्या ज्या ठिकाणावरून चोरल्या ते पाच गुन्हे म्हणजे हिमायतनगर-3, तामसा-1 आणि वजिराबाद-1 असे आहेत. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दुचाकी चोरट्यांना पकडून गुन्हेगारीवर अंकुश कसण्यात प्रयत्नशिल असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक केले आहे.