ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी 31 मार्च आनंद घेवून आला

महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांची वाढ; मार्चच्या वेतनासोबत रोखीने मिळणार थकबाकी 

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना आज राज्य शासनाच्या वित्त विभागाने 31 मार्चपुर्वी मोठी भेट दिली आहे. महागाई भत्ताचा दर 28 टक्केवरून 31 टक्के केला आहे. तसेच 1 जुलै 2021 पासून त्या थकबाकीसह वाढीव महागाई भत्ता रोखीने मार्च 2022 च्या वेतनासह देण्यासाठी दोन स्वतंत्र शासन निर्णय जारी केले आहेत. राज्य शासकीय आणि त्यांच्यासोबत इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी 31 मार्च आनंद घेवून आला आहे.

राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पुर्णकालीक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता दरात सुधारणा करून राज्य शासनाने 1 जुलै 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यावरून 31 टक्के केला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता वाढवून मिळणार आहे. राज्य शासनाने भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचा आदेश या शासननिर्णयाच्या संदर्भात जोडला आहे. हा शासन निर्णय संकेतांक 202203301441163905 नुसार शासकीय संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.

दुसऱ्या शासन निर्णयात राज्य शासनाने 7 ऑक्टोबर 2021 चा संदर्भ देत शासनाने राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या तिन महिन्यांच्या कालावधीतील 11 टक्के महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम मार्च 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश दिले आहेत. या शासन निर्णय राज्य शासनाने संकेतांक क्रमांक 202203301451122805 नुसार राज्य शासनाच्या संकेतस्थावर प्रसिध्द केला आहे. या दोन्ही शासन निर्णयावर वित्त विभागाचे उपसचिव विनायक धोत्रे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. राज्य शासन कर्मचाऱ्यांना शासनाने यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यापुर्वी 31 मार्च च्या पुर्व संध्येवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ही सुंदर भेट दिली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *