नांदेड(प्रतिनिधी)-किनवट शहरातील एक कुटूंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 2 लाख 44 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. मौजे रुई ता.कंधार येथून एका घरातून चोरट्यांनी 63 हजार रुपयांचे दागिणे चोरले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे.
किनवट येथील भारत पांडूरंग मुलगुलवार हे व्यवसायीक आयप्पा स्वामीनगर किनवट येथे राहतात. सर्व मुलगुलवार कुटूंबिय आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते आणि हीच संधी साधून कोणी तरी चोरट्यांनी दि.28 मार्चच्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान हे घर फोडले. त्यातून रोख रक्कम सोन्याचे शिक्के असा एकूण 2 लाख 44 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.
रुई ता.कंधार येथे 28 मार्चच्या रात्री बालाजी काशिनाथ जवादवार यांचे कुटूंबिय जेवन करून वरच्या मजल्यावर झोपले असतांना कोणी तरी चोरट्यांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील फ्रिजवर ठेवलेल्या चाबीने कपाट उघडले आणि त्यातील सोन्या-चांदीचे दागिणे 63 हजार रुपये किंमतीचे चोरून ेले आहेत. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार व्यवहारे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशोसाई हॉस्पीटल येथून 26 मार्च रोजी दुपारी 4 ते रात्री 8.30 वाजेदरम्यान नागोराव कोंडीबा भरकडे रा.कामळज ता.लोहा यांनी उभी केलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एन.4952 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली. नांदेड ग्रामीण पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
