नांदेड,(प्रतिनिधी)- गाडीपुरा भागात घरात चालणारा जुगार अड्डा इतवारा पोलिसानी शोधला आणि त्यात जुगार खेळणाऱ्या ७ जणांना पकडले.त्यांच्या ३८ हजार ५५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक गणेश गोटके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २९ मार्च २०२२ रोजी सायंकाळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्या कडून परवानगी प्राप्त करून पोलीस निरीक्षक भगवान धबडगे,पोलीस उप निरीक्षक शेख असद,पोलीस अंमलदार मांडवकर,हबीब चाऊस, कस्तुरे, हंबर्डे, सय्यद आणि महिला पोलीस असे पथक गाडीपुरा भागात पोहचले. तेथे रात्री ८ ते ८.३० या वेळे दरम्यान गिरधरसिंह जम्मूसिंह ठाकूर यांच्या घरात चालणार जुगार अड्डा शोधला.तेथे ५२ पत्यांवर तिर्रट हा जुगार खळण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम सुरु होते.त्या ठिकाणी इतवारा पोलिसांनी शिवराजसिंह शीतलसिंह परमार, दीपक आबाजी खैरे,अजय कल्याणसिंह देशमुख,बजरंगसिंह चांदसिंह ठाकूर,बालाजी गणपती लोंढे,विजयसिंह करणसिंह ठाकूर,गिरधरसिंह जम्मूसिंह ठाकूर अश्या ७ जणांना पकडले.त्यांच्या कडून जुगार खेळण्याचे पत्ते आणि ३८ हजार ५५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
इतवारा पोलिसांनी याबाबत गुन्हा क्रमांक ६०/२०२२ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ३ आणि ४ नुसार दाखल केला आहे.तपास पोलीस निरीक्षक भगवान धबडगे हे करीत आहेत. पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे,अपर पोल्सी अधीक्षक निलेश मोरे,पोल्सी उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी इतवारा पोलीस पथकाचे कौतुक केलॆ आहे.