क्राईम ताज्या बातम्या

अत्याचार करून अनसीन फोटो काढणाऱ्यास पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस भरतीच्या कारणावरुन ओळख झालेल्या 22 वर्षीय युवतीवर अत्याचार करून तिचे अनसिन फोटो काढणाऱ्या 24 वर्षीय युवकाला विशेष ऍट्रॉसिटी न्यायालयाचे न्यायाधीश संजय बांगर यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका किरायाच्या रुममध्ये राहणाऱ्या शेख अलताफ शेख इकबाल (24) रा.चांडोळा ता.मुखेड या युवकाची ओळख पोलीस भरतीमध्ये असणाऱ्या एका 22 वर्षीय युवतीशी झाली. हे दोघे नांदेडच्या एका ऍकॅडमीमध्ये एकत्रीतपणे पोलीस भरतीची तयारी करत होते. 4 नोव्हेंबर 2021 रोजी अभ्यासातील माहिती देण्यासाठी त्या 22 वर्षीय युवतीला शेख अलताफने आपल्या खोलीवर बोलावले. त्या दिवशी तिच्यासोबत अतिप्रसंग केला आणि तिचे अनसिन फोटो पण काढले. याबाबत युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 108/2022 कलम 376 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3 आणि 5 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्याकडे देण्यात आला.

आज भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सादिक पटेल आणि इतरांनी शेख अलताफ शेख इकबालला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश संजय बांगर यांनी अनुसूचित जातीच्या युवतीवर अत्याचार करून तिचे अनसिन फोटो काढणाऱ्या शेख अल्ताफ दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *