ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

हदगाव येथील अल्पवयीन बालिका प्रकरणात दोन चुलत भावांना तीन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-अल्पवयीन बालिका प्रकरणात हदगाव पोलीसांनी स्थानिक गुन्हा शाखेमध्ये हैद्राबाद लॉकअप चौकशी करून आरोपीविरुध्द 363 च्या गुन्ह्यात पोक्सोची वाढ केली. आज 29 मार्च रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी याप्रकरणातील दोन भावांना 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.22 फेबु्रवारी 2022 रोजी हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 17 वर्ष 11 महिना वय असलेली एक अल्पवयीन बालिका आपल्या घरातून निघून गेली. त्यानंतर 24 फेबु्रवारी रोजी याबाबत पालकांच्या तक्रारीवरुन हदगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 51/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 363 प्रमाणे दाखल केला. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरिक्षक कदम यांच्याकडे देण्यात आला.
28 मार्च रोजी सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही अल्पवयीन बालिका, तिच्यासोबत लग्न केलेला तिचा नवरा यांची हैद्राबाद लॉकअप तपासणी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत झाली. त्यानंतर बालिकेचा जबाब नोंदविण्यात आला आणि त्या जबाबानुसार या प्रकरणात रजत प्रकाश गणमुखे (18) आणि त्याचा चुलत भाऊ आकाश सत्यप्रकाश गणमुखे (24) या दोघांना अटक झाली. बालिकेच्या जबाबाप्रमाणे या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 366, 417, 376(2)(एन) आणि अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचारास प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम 4 आणि 17 ची वाढ करण्यात आली. पोलीस अभिलेखाप्रमाणे रजत प्रकाश गणमुखेला 29 मार्चच्या 01.51 वाजता अटक करण्यात आली. तसेच त्याचा भाऊ आकाशला 28 मार्च रोजी 21.38 वाजता अटक करण्यात आली. अटकेनंतर हा प्रकार कायदेशीर झाला.
आज नांदेड येथील विशेष पोक्सो न्यायालयात दोन्ही चुलत भाऊ गणमुखेंना हजर केल्यानंतर त्यांच्यावतीने वकीलांनी सांगितले की, बालिकेची परवानगी होती आणि 23 मार्च 2022 रोजी दोघांनी आळंदी येथे लग्न केले आहे. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश के.एन.गौतम यांनी अल्पवयीन बालिका प्रकरणात रजत आणि आकाश गणमुखे या दोन चुलत भावांना 1 एप्रिल 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *