नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ आणि ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.रमेश कनकदंडे यांच्या संकल्पनेतील पक्षकारांच्या सोयीसाठी आज त्यांचे बंधू ऍड.महेश कनकदंडे यांनी सुरू केलेल्या पाणपोईचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अनेकर यांनी केले.
नांदेड येथील अभिवक्ता संघाचे ज्येष्ठ सदस्य ऍड.रमेश कनकदंडे यांनी अनेक वर्षापासून नांदेड न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांच्या सोयीसाठी बऱ्याच योजना राबवल्या. त्यांच्या संकल्पनेला पुढे नेत त्यांचे बंधू नगरसेवक, महानगरपालिकेतील सभागृह नेते ऍड. महेश कनकदंडे यांनी आजपासून न्यायालय परिसरात पाणपोईची सुरूवात केली.
या कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अनेकर, जिल्हा न्यायाधीश के.एन.गौतम, मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने, विधिसेवा प्राधिकरणचे सचिव राजेंद्र रोटे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सचिन पाटील, जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. आशिष गोदमगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोबतच ऍड.बी.आर.भोसले, ऍड. व्ही.डी.पाटनूरकर, जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड. सतिश पुंड, सचिव नितीन कागणे, ऍड.उमेश मेगदे, ऍड. सोनारीकर, ऍड. सय्यद अरीबोद्दीन, ऍड. जगजीवन भेदे, ऍड. विजय भोपी, ऍड. अनुप कुर्तडीकर यांच्यासह अनेक वकील मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार ऍड.नयुम खान पठाण यांनी मानले.
