चेन्नई येथे उत्कृष्ट राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सन्मानित
नांदेड(प्रतिनिधी)-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते विकासासोबत सुरक्षीतेच्या मिशनमध्ये नांदेडचे बाबूराव शक्करवार यांचा सहभाग असल्याने हे नांदेडकरांसाठी भूषणावह असल्याचे मानले जाते.
बिल्डर असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूराव शक्करवार यांना नुकतेच चेन्नई येथे उत्कृष्ट राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले. नांदेडमध्ये 1981 पासून अगदी पाच हजारापासून काम सुरू करून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मजल मारली. आता त्यांची कामे आंध्रा, तामिळनाडू व महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यांनी बिल्डर असोसिएशनची 1991 मध्ये स्थापना केली. 2009 ते 2021 पर्यंत नांदेडचे जिल्हाक्ष होते. सन 2011 ते 2012 मध्ये ते महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले. तर 2020 पासून नॅशनल व्हाईस प्रेसीडेंट झाले. बिल्डर असोसिएशनमध्ये साधारण एक लाखापेक्षा अधिक भारतात सदस्य आहेत. एवढ्या मोठ्या असोसिएशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांनी झेप घेतली असून एवढ्यावरच न थांबता दि.11 मार्च 2022 रोजी चेन्नई येथील महाबली पूरम येथे त्यांच्या बेस्ट व्हाईस प्रेसीडेंट म्हणून ही सन्मान करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांनी खुप चांगले कार्यक्रम घेतले. त्यात चांगले सेमीनार आणि चांगले प्रेझेन्टेशनही दिले. या संघटनेकडून पंतप्रधान व मुख्यमंत्री फंडमध्ये मदतनिधी देण्यात आली होती. बाबूराव शक्करवार यांनी केंद्रीमंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय सुरक्षा मिशनमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असून जवळपास भारतातील विविध ठिकाणी सुरक्षीतेचे बोर्ड लावण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. हे नांदेडकरासाठी भूषणावह मानले जाते. चेन्नई येथे संपन्न झालेल्या बिल्डर्स कन्व्हेन्शन कार्यक्रमात बी. एक. आय नांदेड सेंटरचे श्री बाबुराव शक्करवार, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष यांना राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट उपाध्यक्ष म्हणून सन्मानित केल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष श्री आर.एन. गुप्ता, माजी अध्यक्ष एम. यू. मोहन, नांदेड सेंटरचे नरेश पैंजणे, एन. एस. शेट्टी, व माणिकराव हेंद्रे.