ताज्या बातम्या विशेष

हदगाव पोलीसांनी एक युवक ‘हैद्राबाद लाँकअप’ मध्ये स्थानिक गुन्हा शाखेत ठेवला

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेलेल्या युवकाला ताब्यात घेवून हदगाव पोलीस त्याची तपासणी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत करत आहेत. या संदर्भाने विधीज्ञाना या परिस्थितीची माहिती विचारली असता असा प्रकार ईलिगल डिटेन्शन(हैद्राबाद लॉकऍप) या प्रकारात मोडतो असे विधीज्ञानी सांगितले.
हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्ष वयाच्या अल्पवयीन बालिकेला 24 फेबु्रवारी 2022 रोजी दुपारी 12 ते दुपारी 4 या वेळेदरम्यान तिच्या घरातून अज्ञात माणसाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार आली. त्यानंतर हदगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 51/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरिक्षक कदम यांच्याकडे देण्यात आला.
आज दि.28 मार्च रोजी दिसलेल्या परिस्थितीनुसार ही अल्पवयीन बालिका आणि तिला पळवून नेणारा रजत गणमुखे (22) हा असे दोघे नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील कक्षामध्ये बसवून त्यांचा तपास सुरू होता. पोलीस ठाणे हदगाव येथे माहिती घेतली असता रजत गणमुखेला अद्याप अटक झालेली नाही. पोलीस अधिक्षक कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रजत गणमुखे आणि ती अल्पवयीन बालिका पोलीस अधिक्षक कार्यालयात आहेत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल दि.27 मार्च रोजी पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे.
पोलीसांनी कोणाला ताब्यात घेतले तर 24 तास ते आपल्या ताब्यात ठेवून शकतात पण त्यासाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची अटक दाखवणे आवश्यक आहे अशी माहिती विधीज्ञानी दिली. याही पुढे रजत गणमुखेने त्या बालिकेसोबत तिचे 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर लग्न केल्याचेही पुरावे रजत गणमुखेने महिला पोलीस उपनिरिक्षक कदम यांच्याकडे दिल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. अशाच प्रकारे या दोघांना ताब्यात घेतल्याबद्दल सुध्दा वकील मंडळी सांगतात हे ईलिगल डिटेन्शन आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.