नांदेड,(प्रतिनिधी)- कु.दीपा प्रकाश गवळेने एनआयएस प्रमाणपत्र उत्तम गुणांकनाने पूर्ण करून बॉक्सिंग कोच म्हणून नांदेड जिल्ह्यातील पहिला महिला होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे.
बॉसिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या नांदेडच्या कु.दीपा प्रकाश गवळेने पटियाला (पंजाब) येथे जानेवारी ते मार्च दरम्यान झालेल्या बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिरात उत्तम गुणांकन घेऊन ते प्रशिक्षण पूर्ण केले.आता दीपा प्रकाश गवळेह्या बॉक्सिंग एनआयएस कोच झाल्या आहेत.नांदेड जिल्ह्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.ज्यांना बॉक्सिंग कोच होण्याचा बहुमान मिळाला आहे.
दीपा प्रकाश गवळेच्या यशासाठी वोवीनाम असोशिएशन ऑफ इंडिया अध्यक्षा सौ.सोनल रावका,संचालक किरण गवळे आंतरराष्ट्रीय खेळाडू शेख फारुख,आदींनी अभिनंदन केले आहे.आपल्या क्रीडा प्रकारात यश संपादन करण्यासाठी शंकर महाबळे,भाग्यश्री महाबळे,यांनी मार्गदर्शन केले आहे.