ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

मुखेड पंचायत समिती फोडणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेने गुन्हा दाखल झाल्यावर कांही तासातच अटक करून तीन प्रिंटर आणि तीन मॉनीटर जप्त केले

अत्यंत दमदार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास वडजे पाटील यांची कार्यवाही
नांदेड(प्रतिनिधी)-23 ते 25 मार्च दरम्यान मुखेड पंचायत समितीचे गोडाऊन फोडून त्यातून 1 लाख 7 हजारांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास वडजे आणि त्यांच्या पथकाने जेरबंद करून त्याच्याकडून 51 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
दि.23 ते 25 मार्च दरम्यान मुखेड पंचायत समितीचे गोडाऊन फोडून त्यातून 3 संगणक, 3 मॉनीटर, 3 प्रिंटर आणि 3 प्रोजेक्टर असा 1 लाख 7 हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. 27 मार्च रोजीच्या प्रेसनोटमध्ये पोलीस विभागाने या घटनेची प्रसिध्दी करण्यासाठी वर्तमानपत्रांना माहिती पाठवली होती.
आज दि.27 मार्च रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे अत्यंत कर्तव्यदक्ष नदीपाहणी दौऱ्यामध्ये कर्तबगार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास वडजे, पोलीस अंमलदार सुरेश घुगे, बालाजी तेलंग, मोतीराम पवार आणि बजरंग बोडके हे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात गस्त करत असतांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांना एका माहितीगाराने माहिती दिली की, मुखेड येथील चोरीचा ऐवज व्यंकटेश कमलाकर जाधव (20) रा.गायकवाडगल्ली मुखेड याच्या ताब्यात आहे. सध्या तो स्टेडीयमजवळ आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व्यंकटेश कमलाकर जाधवला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलीसांनी 3 प्रिंटर आणि 3 मॉनीटर असा 51 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत सविस्तर अहवाल लिहुन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास वडजे यांनी चोरी करणारा आरोपी व्यंकटेश कमलाकर जाधव आणि तीन प्रिंटर, तीन मॉनीटर, मुखेड पोलीसांच्या ताब्यात दिले आहेत. पुढील कार्यवाही मुखेड पोलीसांनी करावी अशी विनंती मुखेड पोलीस निरिक्षकांना करण्यात आली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *