क्राईम ताज्या बातम्या

चार विविध चोऱ्यांमध्ये 4 लाख 24 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे तीन दरोडेखोरांनी जबरी चोरी केली आहे. शिराढोण येथे चोरट्यांनी कांही घरे फोडली आहेत. मुखेड पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पातून साहित्य चोरीला गेले आहे. शहरातील सकोजीनगर भागात एक शटर तोडून सोन्याचे साहित्य चोरीला गेले आहे. या चार चोरी प्रकारांमध्ये 4 लाख 24 हजार 109 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. मागच्या 24 तासात पोलीस दप्तरी अनेक दुचाकी गाड्यांची चोरी झाल्याच्या नोंदी आहेत.
पिलाजी यल्लप्पा देवकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 मार्च रोजी दुपारी 3 वाजता त्यांच्या मालकीच्या जमीनीवर येवून कांही दरोडेखोरांनी तेथे लावलेले सिमेंटचे खांब उखडून टाकले आणि नुकसान केले. तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसुत्र 10 ग्रॅम वजनाचे 30 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले आहेत. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.
बाबूराव नागनाथ शिराळे रा.शिराढोण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 मार्चच्या रात्री 10 ते 26 मार्चच्या पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांचे आणि त्यांच्या शेजाऱ्यांचे घर फोडून चोरट्यांनी 2 लाख 36 हजार 109 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकते अधिक तपास करीत आहेत.
चेतन साहेबराव अहिरे हे पंचायत समितीत विस्तार अधिकारी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचायत समिती मुखेड येथील कार्यालय फोडतांना चोरट्यांनी गोडाऊनच्या खिडकीचे गज काढून आत प्रवेश केला आणि त्यातून दोन संगणक, तीन मॉनिटर, तीन प्रिंटर, एक प्रोजेक्टर असा 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार 23 जानेवारीच्या सकाळी 5 ते 25 जानेवारीच्या सकाळी 5.30 वाजेदरम्यान घडला आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक काळे हे करीत आहेत.
सखोजीनगर येथी धर्मराज जगदिशसिंह ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 मार्चच्या रात्री 9 ते 24 मार्चच्या पहाटे 6.30 वाजेदरम्यान त्यांचे सोन्या-चांदीचे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिणे असा 51 हजारांचा ऐवज चोरून नेलेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केलेला असून पोलीस अंमलदार देशमुख अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.