नांदेड (प्रतिनिधी)-दक्षिण नांदेडमध्ये भव्य बांधण्यात आलेल्या महेश आवाज योजनेच्या लोकापर्ण सोहळ्यात स्थानिक आमदारांना निमंत्रीत न केल्याने समर्थकांत नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.
नांदेड शहरातील कौठा परिसरात महेश आवास योजनेअंतर्गत भव्य निवासी पार्क बांधण्यात आले आहे. बियाणी डेव्हल्पर्सचे संचालक संजय बियाणी यांनी नांदेडच्या वैभवात या पार्कमुळे आणखी भर टाकली आहे. सदरील पार्कचा लोकापर्ण सोळाही त्यांच्या नावाला शोभेल असाच घेतला असून विद्यमान पालकमंत्री अशोकराव चव्हाण व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना निमंत्रीत केले. पण या सोहळ्याला स्थानिक आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधींना डावलल्याने कुजबूज सुरू झाली. मोठ्याप्रमाणात जाहिरातही करण्यात आल्या. पण यात कोठेही आमदारांना निमंत्रीत न केल्या गेल्याने समर्थकांत नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. अल्पावधीत संजय बियाणी यांनी मोठमोठ्या बिल्डींग बांधून भरारी घेतली. त्यांच्यावर शारदानगर परिसरात मनपाच्या भूखंडावर अवैध बांधकाम केल्याचा आरोपासह मंजूर नकाशाच्या विरुद्ध बांधकाम किंवा निकृष्ट बांधकाम करत असल्याचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यांनी केवळ चांगले कामे करून नांदेडरांना उत्कृष्ट वास्तु देण्याचा सपाटा लावला. हे कौतुकास्पद मानले जाते. अगोदरपासूनच वेगवेगळे आरोप करून त्यांना घेरण्याच्या प्रयत्न करत असणारे त्यांचे विरोधक आणि अमंत्रित न केल्याने दुखावलेले आमदारांचे समर्थकांतील नाराजी काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोकर्णांनाही धक्का
राजस्थानी समाजात माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचे आदाराचे स्थान आहे. महापौर, आमदार असतांना बियाणी त्यांच्याच अवती भोवती दिसत असत. मोठ्यांसहीत अनेक बिल्डींगच्या पाया भरणीची पूजा त्यांच्याहस्ते होत होत्या पण कौठा येथील आवास योजनेच्या लोकपर्ण सोहळ्याच्या पत्रिकेत त्यांचेही नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. आता बियाणी यांची वाढती उंची माजी आमदार पोकर्णा यांना धक्का देणारा असल्याचे मानले जाते आहे.
