ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

वडीलांनी दिली मुलाची सुपारी; खून करणाऱ्या चौघांना पाच दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या उपसरपंच मुलाचा खून करून त्याच्या मृत्यूचा बनावट पणा करून दाखविणाऱ्या एका पित्यासह चार जणांना हदगावचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जितेंद्र जाधव यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.

23 मार्च 2022 रोजी उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथून एक एमएलसी आली त्यामध्ये अविनाश बंडू भोयरच्या प्रेताची तपासणी केली. वैद्यकीय अहवालामध्ये गळाआवळून खून केल्याचा अभिप्राय आला. त्यानंतर पंचासमक्ष सर्व कार्यवाही पुर्ण झाली. त्यावेळी अविनाश भोयरचे वडील बंडू शेषराव भोयर यांचा जबाब घेतला असता त्याने ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये भरपूर कर्ज घेवून निवडणूक लढविली होती. दोन वर्षापुर्वी 10 गुंठे जमीन विक्री केली होती. अविनाश हा अविवाहित होता. त्यामुळे त्याचे लग्न ठरत नव्हते याचाही त्यांच्यावर प्रभाव होता. अविनाश भोयरने मला 50 ते 60 लाख रुपयांचा बुडवले आहे, दोन एकर जमीन गेली आहे. त्यानंतर 22 मार्चच्या सकाळी 10 वाजता मी दिलेल्या सुपारी प्रमाणे इतरांनी त्याचा खून केला. खूनाचा कट रचणारा अविनाशचा वडील बंडू शेषराव भोयर रा.वरुला ता.हदगाव, सुपारी घेवून खून करणारे राजाराम देवराव जाधव रा.भाटेगाव ता.हदगाव, विठ्ठल भगवानराव अंभोरे रा.गौळ बाजार ता.कळमनुरी आणि विलास गोविंदराव शिंदे रा.बाभळी ता.कळमनुरी यांचा समावेश आहे. एमएलसीची तपासणी करणारे पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अविनाश बंडू भोयरचा खून करणाऱ्या चार जणांनाविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 120 (ब)(1),201 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 99/2022 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास हदगावचे पोलीस निरिक्षक हनमंत गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. आरोपींना त्वरीत अटक करण्यात आली.

आज दि.25 मार्च रोजी पोलीस निरिक्षक हनमंत गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी अविनाश भोयरचा खून करणारा त्याचा बाप आणि इतर तिघांना हदगाव न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी वकील ऍड.साडेगावकर यांनी न्यायालयासमक्ष सादर केलेल्या विविध मुद्यांनुसार या प्रकरणात पोलीस कोठडी मिळणे अत्यंत आवश्यक होते. न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी अविनाश भोयरचा खून करणाऱ्या चौघांना पाच दिवस अर्थात 30 मार्च 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *