नांदेड,(प्रतिनिधी)- सामाजिक,आर्थिक गुन्हा आहे,आणि अश्या प्रकारच्या व्यक्तीला जामीन दिला तर आणखीन गुन्हे करण्यात त्याचा कल तयार होईल अशी नोंद आपल्या निकालात करून हदगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.जी.पांडे यांनी भ्रष्टाचार मुक्त देश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दत्तात्रय पांडुरंग अनंतवारला जामीन नाकारला आहे.
सन २०२१ च्या शेवटच्या सत्रात माहिती अधिकार कार्यकर्ते,रिट याचिका पटाईत,अर्ज एक्स्पर्ट दत्तात्रय पांडुरंग अनंतवारविरुद्ध मनाठा पोलीस ठाण्यात फसवणूक करणे,खोटे कागदपत्र तयार करणे,ते खोटे कागदपत्र खरे आहे असे भासवणे आदी सदरांप्रमाणे गुन्हा क्रमांक १५०/२०२१ दाखल झाला. त्यानंतर काय काय घडले याबाबत वास्तव न्यूज लाईव्हने सविस्तर बातमी प्रसारित केली होती. https://vastavnewslive.com/2022/03/23/भ्रष्टाचार-मुक्त-समाज-कर/ (हि जुन्या बातमीची लिंक आहे)
इटारसी येथून मनाठा पोलिसांनी दत्तात्रय पांडुरंग अनंतवारला पकडून आणल्या नंतर हदगाव न्यायालयाने त्यास २३ मार्च ते २५ मार्च असे पोलीस कोठडीत पाठवले होते.आज पोलीस कोठडी समाप्त झाल्यानंतर मनाठाचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दत्तात्रय पांडुरंग अनंतवारला न्यायालयात हजर करून वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली.न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवली नाही. लगेच दत्तात्रय पांडुरंग अनंतवारच्या वतीने जामीन अर्ज सादर करण्यात आला.त्यावर झालेल्या सुनावणी नंतर जामीन अर्ज नाकारतांना न्या.पांडे यांनी हा गुन्हा सामाजिक आर्थिक आहे,तसेच दत्तात्रय पांडुरंग अनंतवार विरुद्ध अनेक गुन्हे प्रलंबित आहेत.तसेच जामीन दिला तर दत्तात्रय पांडुरंग अनंतवार पुन्हा असेच गुन्हे घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही,अश्या नोंदी निकालात करून न्या.पांडे यांनी दत्तात्रय पांडुरंग अनंतवारचा जमीन अर्ज फेटाळून लावला असल्याची माहिती सरकारी वकील ऍड.गिरीश मोरे यांनी दिली.हदगाव न्यायालयाच्या या निकालाने आता दत्तात्रय पांडुरंग अनंतवारला तुरूंगवारी निश्चित झाली आहे.
(हि जुन्या बातमीची लिंक आहे)
भ्रष्टाचार मुक्त समाज करण्याचा प्रयत्न करणारा अनंतवारल पोलीस कोठडीत