ताज्या बातम्या नांदेड

जम्मू-काश्मिर येथे होणाऱ्या राष्ट्रीय धर्नुविद्या स्पर्धेत वृषाली पाटील जोगदंड यांना प्रशिक्षक पद

नांदेड(प्रतिनिधी)-काश्मिर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सिनियर धर्नुविद्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी नांदेडच्या वृषाली पाटील जोगदंड यांची निवड करण्यात आली आहे.

जम्मू काश्मिर येथे भारतीय धर्नुविद्या संघाच्यावतीने आयोजित 41 व्या एन.टी.पी.सी.स्पर्धा होणार आहे. भारतीय धर्नुविद्या संघटनचे महासचिव प्रमोद चांदूरकर यांनी नांदेडच्या वृषाली पाटील जोगदंड यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी निवड केली आहे.

22 ते 27 मार्च 2022 दरम्यान होणाऱ्या स्पर्धांमध्ये रिकर्व्ह प्रकारच्या प्रशिक्षक पदी निवड झाली आहे. वृषाली पाटील यांनी अगोदर अशा अनेक स्पर्धांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रामलू पारे, रमेश चावरे, प्रलोभ कुलकर्णी, सोनल बुंदेले, जयपाल रेड्डी, राजेश्वर मारावार, किशोर पाठक, गुरदिपसिंघ, जर्नाधन गुपिले, डॉ.हसंराज वैद्ये, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरिक्षक फत्तेसिंह पाटील, डॉ.विठ्ठलसिंह परिहार, डॉ.मनोज पैंजणे, डॉ.अश्विन बोरीकर, डॉ.विजय वडजे, बाबू गंदपवाड, सुरेश पांढरे, सुधाकर जोगदंड, मालोजी कांबळे, शिवाजी पुजरवाड, प्रकाश जाधव, नारायण गिरगावकर, गंगालाल यादव, डॉ.राहुल वाघमारे, राजेश्रीताई पाटील, विजय कांबळे, सुशिल दिक्षीत, राजेश जांभळे, प्रविण कुपटीकर, शंकर जाधव, बालाजी चेरले, डॉ.रमेश नांदेडकर, बालाजी पाटील जोगदंड यांनी अभिनंदन केले आहे. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा वृषाली पाटील जोगदंड यांना भविष्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभकामना प्रेषित करीत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.