ताज्या बातम्या नांदेड

कोरोनाने शुक्रवारी सुट्टी घेतली

नांदेड(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने एकही नवीन रुग्ण दिलेला नाही.आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 06 आहे.कोरोना बाधेतून मुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 97.33 आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज दि.25 मार्च रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज नवीन कोरोना रुग्ण सापडले नाही.नांदेड जिल्ह्यातील तालुका विलगीकरणातील-01 रुग्णाना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 100099 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 97.37 टक्के आहे.

आज 607 अहवालांमध्ये 601 निगेटिव्ह आणि 00 पॉसिटीव्ह आहे.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 102797 झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत 00 आणि 00 अँटीजेन तपासणीत असे एकूण 00 रुग्ण नवीन सापडले आहेत. आज प्रलंबित अहवाल 00 आहेत.आज नाकारण्यात आलेले स्वॅब 06 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 00 आहेत.

आज कोरोनाचे 06 ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण-05, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-01,असे उपचार सुरू आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.