नांदेड(प्रतिनिधी)- सासऱ्याने आपल्या सूनबाई सोबत गैरकृत्य केल्याच्या घटनेतून मुलानेच बापाचा खून करून त्याचे प्रेत रेल्वे पटरीवर टाकून दिल्याचा प्रकार 22 मार्च रोजी सकाळी उघडकीस आला.
चंद्रकलाबाई भुमन्ना गड्डम रा.तेलंगणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ शंकर विठ्ठल बोगुलवार (54) यास त्यांचा मुलगा विठ्ठल शंकर बोगुलवार याने मारहाण करून त्याचा खून केला आणि त्याचे प्रेत अतकुर गावाजवळ रेल्वे पटरीवर टाकून दिले. याबाबतचे कारण महाभयंकर आहे. 21 तारेखेला मारेकरी विठ्ठल शंकर बोगुलवारच्या पत्नीसोबत त्याच्या बापानेच गैरकृत्य केले. घडलेला घटनाप्रकार महिलेने आपल्या नवऱ्याला सांगितला आणि आपल्या पत्नीसोबत बापाने केलेल्या कृत्याच्या रागातून त्याने बापचा खून केला. धर्माबाद पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमंाक 79/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विजय पंतोजी यांच्याकडे देण्यात आला आहे.
