ताज्या बातम्या नांदेड

रेल्वे स्थानकासमोरील पंजाब लॉजमध्ये डॉक्टर महिलेची आत्महत्या

नांदेड(प्रतिनिधी)-एका डॉक्टर महिलेने शहरातील रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या पंजाब लॉजमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार 24 मार्चच्या सायंकाळी उघडकीस आला. वृत्तलिहिपर्यंत या बाबत आकस्मात मृत्यू नोंद करण्याची प्रक्रिया वजिराबाद पोलीस ठाण्यात सुरू होती.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार डॉ.विद्या अमोल सुंकवाड (33) या महिलेने काल दि.22 मार्च रोजी रेल्वे स्थानकासमोरील पंजाब लॉजमध्ये एक खोली घेतली. दि.23 मार्च रोजी सकाळी ती उठली बाहेर गेली आणि पुन्हा आपल्या खोलीत थांबली. आज दि.24 मार्च रोजी सकाळी ती उठली नाही, तिने आपल्या रुमचे दार उघडले नाही म्हणून लॉजच्या व्यवस्थापनाने दार वाजविले. तरीपण प्रतिसाद मिळाला नाही. कांही वेळानंतर पुन्हा एकदा लॉज व्यवस्थापनाने प्रयत्न केला परंतू तरीही प्रतिसाद आला नाही तेंव्हा पंजाब लॉज व्यवस्थापनाने वजिराबाद पोलीसांना या बाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, त्यांचे सहकारी अधिकारी, पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. पोलीसांनी दार तोडून दार उघडले आणि तेथे दिसणाऱ्या परिस्थितीनुसार असे दिसते की, डॉ.विद्या सुंकवाडकडे एक बॅग होती. त्यात नवीन नॉयलॉन दोरी होती. अनेक औषध गोळ्या आहेत. तसेच तिच्या शरिरावरील जखमा कटरने केलेल्या आहेत. तिच्या गळ्याची नस, हाताची नस कापलेली दिसते. कटर मयत डॉक्टरच्या हातातच आहे. अशा या परिस्थितीत हा मृतदेह सापडला आहे.
प्राप्त माहितीनुसार डॉ.विद्याचे पती भोकर येथे डॉक्टर आहेत. डॉक्टर पती-पत्नी भोकर येथे राहतात. त्यांचा 5 ते 6 वर्षाचा मुलगा आहे. डॉ.विद्याची आई, आजोबा आणि भाऊ शहरातील फरांदेनगर भागात राहतात. वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाने आकस्मात मृत्यू नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *