

नांदेड(प्रतिनिधी)- माहूर येथून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या युवकासह अल्पवयीन बालिका तेलंगणा पोलीसांच्या मदतीने माहूर पोलीसांनी परत आणली आहे.
माहुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 7 मार्च 2022 रोजी एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेण्यात आले. या संदर्भाने गुन्हा क्रमांक 23/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 363 आणि 34 नुसार दाखल झाला. माहुर येथील पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय पवार, पोलीस अंमलदार चंद्रप्रकाश नागरगोजे,आडे, महिला पोलीस पुसनाके आणि गृहरक्षक जवान रजाक यांनी बालिका आणि तिला पळवून नेणाऱ्या युवकाचा माग काढत हैद्राबाद गाठले. हैद्राबाद येथभल पोलीसांनी नांदेड पोलीसांची मदत केली आणि अल्पवयीन बालिकेला पळवून नेणारा युवक आणि अल्पवयीन बालिका या दोघांना माहुर येथे आणण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय पवार हे करीत आहेत.