नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस आहोत असे सांगून एका सेवानिवृत्ती शिक्षकाकडून दोन तोळे सोन्याची अंगठी, 60 हजार रुपये किंमतीची ठकसेनांनी काढून घेतल्याचा प्रकार पोलीसवाडी ता.लोहा येथे घडला आहे.
किशन नामदेव चव्हाण (68) हे सेवानिवृत्त शिक्षक 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास पोलीसवाडी तळ्याजवळून दुचाकीवर जात असतांना दोन अज्ञात लोकांनी त्यांची दुचाकी थांबवून आम्ही पोलीस आहोत आपल्या हातातील अंगठी खिशात ठेवा असे सांगून त्यांच्या खिशातून ही अंगठी 60 हजार रुपये किंमतीची काढून घेतली. किशन चव्हाण या शिक्षकांनी आरडाओरड केल्याने दोन्ही बोगस पोलीस पळून गेले. लोहा पोलीसंानी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार बगाडे अधिक तपास करीत आहेत.
